वर्धा सायबर पोलिस

सायबर पोलिस आणि ऑटो चालकामुळे वृद्धाला मिळाला दिलासा

Wardha Cyber ​​Police: वर्ध्यात ६० वर्षीय वृद्ध चंद्रशेखर वायुदेव भगत यांचा हरवलेला मोबाईल ऑटो चालक आणि सायबर पोलिसांच्या सहाय्याने परत मिळाला. सामाजिक जबाबदारीने मोबाईल थेट पोलिस स्टेशनला जमा

सायबर पोलिस आणि ऑटो चालकामुळे वृद्धाला मिळाला दिलासा

Wardha Cyber ​​Police

 

प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण; हरवलेला मोबाईल सुखरूप परत

वर्धा (Wardha Cyber ​​Police) : मोबाईल हरवला की, तो परत मिळेल याची आशा अनेकजण सोडून देतात. मात्र वर्धा शहरात घडलेल्या एका घटनेने अजूनही समाजात माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. एका प्रामाणिक ऑटो चालकामुळे आणि सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे ६० वर्षीय वृद्धाला त्यांचा हरवलेला मोबाईल परत मिळाला. वर्ध्यातील चंद्रशेखर वायुदेव भगत हे ऑटोने प्रवास करत असताना त्यांचा मोबाईल गहाळ झाला होता. मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच ते चिंतेत पडले. महत्त्वाचे संपर्क क्रमांक आणि वैयक्तिक माहिती असल्याने मोबाईल परत मिळण्याची त्यांना फारशी अपेक्षा नव्हती.

दरम्यान, संबंधित ऑटो चालक सुलतान शेख करीम शेख यांच्या ऑटोमध्ये तो मोबाईल आढळून आला. कोणताही मोह न बाळगता त्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मोबाईल थेट सायबर पोलिस स्टेशनमध्ये जमा केला. (Wardha Cyber ​​Police) सायबर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल भेग्राम आणि पोलिस हवालदार दिनेश बांधकर यांनी तत्काळ मोबाईलच्या मूळ मालकाचा शोध घेतला. त्यानंतर चंद्रशेखर भगत यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचा मोबाईल सुरक्षितपणे परत देण्यात आला.

हरवलेला मोबाईल पुन्हा हातात मिळाल्यानंतर भगत यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. त्यांनी ऑटो चालक आणि (Wardha Cyber ​​Police) पोलिस प्रशासनाचे मनापासून आभार मानले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी प्रामाणिकपणाच्या अशाच एका घटनेची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या सकारात्मक संदेशाचा प्रभाव समाजावर दिसून येत असून, अवघ्या दोन दिवसांत पाच नागरिकांनी त्यांना सापडलेले मोबाईल स्वतःहून (Wardha Cyber ​​Police) सायबर पोलिसांकडे जमा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे आजही समाजात माणुसकी, विश्वास आणि प्रामाणिकपणाची साखळी कायम असल्याचा दिलासादायक संदेश मिळत आहे.

संबंधित सामग्री

ज्येष्ठांचा सन्मान ही कायदेशीर जबाबदारी, दुर्लक्ष करणाऱ्या वारसांवर होणार कारवाई

ज्येष्ठांचा सन्मान ही कायदेशीर जबाबदारी, दुर्लक्ष करणाऱ्या वारसांवर होणार कारवाई

Officer Samadhan Ghutukade: ज्येष्ठांचे सन्मान करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी केंद्रीय अधिनियम २००७ लागू करण्यात उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांनी जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठांना आवाहन केला.

Jul 26, 2026
वृक्ष म्हणजे जीवनाचा संदेश; विकास हायस्कूल बॅच-2000 हेल्पिंग हँड ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम

वृक्ष म्हणजे जीवनाचा संदेश; विकास हायस्कूल बॅच-2000 हेल्पिंग हँड ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम

Helping Hand Group Initiative: विकास हायस्कूलचे माजी विद्यार्थी व विकसित हँड ग्रुपने श्रीराम सरोवर परिसरात ५०+ वृक्ष रोपण करीत पर्यावरण संरक्षणाची क्रीडा, धार्मिक स्थळाचे सौंदर्य वाढविण्यासाठी उपक्रम

Jul 13, 2026
आ. संतोष बांगर यांच्या मदतीने चिमुकल्याच्या उपचाराला आधार

आ. संतोष बांगर यांच्या मदतीने चिमुकल्याच्या उपचाराला आधार

डोळ्याच्या गंभीर विकाराने त्रस्त असलेल्या एजाज मोहम्मद अली खान या चिमुकल्याला आमदार संतोष बांगर यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

May 12, 2026
आहो आश्चर्य,मुलगी बघायला गेले,आणि विवाह लावुन आले..!

आहो आश्चर्य,मुलगी बघायला गेले,आणि विवाह लावुन आले..!

Risod Ideal marriage: रिसोड येथील चि.प्रदिप शालीकराम भालेकर आणि चि.सौ.शारदा आवटे यांचा विवाह अवघ्या पन्नास उपस्थितीत आणि साध्या पद्धतीने संपन्न झाला.

Apr 25, 2026