अधिकारी समाधान घुटुकडे

ज्येष्ठांचा सन्मान ही कायदेशीर जबाबदारी, दुर्लक्ष करणाऱ्या वारसांवर होणार कारवाई

Officer Samadhan Ghutukade: ज्येष्ठांचे सन्मान करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी केंद्रीय अधिनियम २००७ लागू करण्यात उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांनी जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठांना आवाहन केला.

ज्येष्ठांचा सन्मान ही कायदेशीर जबाबदारी, दुर्लक्ष करणाऱ्या वारसांवर होणार कारवाई

Officer Samadhan Ghutukade

 

उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांचे आवाहन

हिंगोली (Officer Samadhan Ghutukade) : आई-वडिलांची सेवा करणे ही केवळ नैतिक जबाबदारी नसून ती आता कायद्याने बंधनकारक करण्यात आली आहे. वयोवृद्ध आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे यासाठी केंद्र सरकारने "आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007" लागू केला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे (Officer Samadhan Ghutukade) यांनी जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढे येऊन आपले हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.

घुटुकडे (Officer Samadhan Ghutukade) यांनी सांगितले की, 60 वर्षे वय पूर्ण झालेल्या कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला या कायद्यांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडे थेट प्रकरण दाखल करता येणार आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. कायद्यानुसार मुलगा, मुलगी, नातू, नात किंवा कायदेशीर वारस यांच्यावरच ज्येष्ठ नागरिकांच्या निर्वाहाची जबाबदारी असते. जर त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते.

या कायद्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत निर्वाह भत्ता मिळवून देण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. याशिवाय अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर जलद आणि सुलभ पद्धतीने निर्णय घेण्याची प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. केवळ आर्थिक मदतच नाही तर ज्येष्ठ नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करणे देखील या कायद्याचे उद्दिष्ट आहे.

विशेषतः ज्या ज्येष्ठ नागरिकांनी देखभाल करण्याच्या अटीवर आपली मालमत्ता मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावे केली असेल आणि नंतर त्यांचीच उपेक्षा झाली असेल तर अशा परिस्थितीत कायद्याच्या कलम 23 नुसार केलेले हस्तांतरण रद्द करण्याची तरतूदही यात आहे. यामुळे ज्येष्ठांना वाऱ्यावर सोडण्याच्या प्रवृत्तीला चाप बसणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या कोणत्याही तक्रारींचे कायदेशीर पद्धतीने निवारण करण्याची व्यवस्था देखील या कायद्यात करण्यात आली आहे.

"ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. कायद्याने दिलेले अधिकार माहीत नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ आपल्या हक्कांपासून वंचित राहतात. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या पाल्यांकडून योग्य ती काळजी मिळत नसेल त्यांनी घाबरून न जाता थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेऊन न्याय दिला जाईल," असे आवाहन उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे (Officer Samadhan Ghutukade) यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या आता सामाजिक न्याय मंत्रालयाच्या दिल्ली दरबारी: डॉ. हंसराज वैद्य 

ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या आता सामाजिक न्याय मंत्रालयाच्या दिल्ली दरबारी: डॉ. हंसराज वैद्य 

Dr. Hansraj Vaidya: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नांदेड दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ नागरिक संघ उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्या

Jul 16, 2026
वृक्ष म्हणजे जीवनाचा संदेश; विकास हायस्कूल बॅच-2000 हेल्पिंग हँड ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम

वृक्ष म्हणजे जीवनाचा संदेश; विकास हायस्कूल बॅच-2000 हेल्पिंग हँड ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम

Helping Hand Group Initiative: विकास हायस्कूलचे माजी विद्यार्थी व विकसित हँड ग्रुपने श्रीराम सरोवर परिसरात ५०+ वृक्ष रोपण करीत पर्यावरण संरक्षणाची क्रीडा, धार्मिक स्थळाचे सौंदर्य वाढविण्यासाठी उपक्रम

Jul 13, 2026
आ. संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून भव्य ‘माऊली वृद्धाश्रम' साकारणार

आ. संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून भव्य ‘माऊली वृद्धाश्रम' साकारणार

MLA Santosh Bangar: 'माऊली वृद्धाश्रम'च्या भौमिपूजनासाठी आमदारी संतोष बांगर यांचा माता-पिता हसतांना हस्ते करण्यात येत असले. या आश्रमात आढळणाऱ्या अतिशय गरजू वृद्धांसाठी मोफत पौष्टिक भोजन

Jul 05, 2026
ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा आजीबाईला न्याय; नोंदणीकृत बक्षीसपत्र व फेरफार रद्द करण्याचे आदेश

ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा आजीबाईला न्याय; नोंदणीकृत बक्षीसपत्र व फेरफार रद्द करण्याचे आदेश

आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ अंतर्गत लातूर यांनी एका महत्त्वपूर्ण प्रकरणात वृद्ध महिलेला न्याय देणारा आदेश पारित केला आहे.

Jun 09, 2026
सायबर पोलिस आणि ऑटो चालकामुळे वृद्धाला मिळाला दिलासा

सायबर पोलिस आणि ऑटो चालकामुळे वृद्धाला मिळाला दिलासा

Wardha Cyber ​​Police: वर्ध्यात ६० वर्षीय वृद्ध चंद्रशेखर वायुदेव भगत यांचा हरवलेला मोबाईल ऑटो चालक आणि सायबर पोलिसांच्या सहाय्याने परत मिळाला. सामाजिक जबाबदारीने मोबाईल थेट पोलिस स्टेशनला जमा

May 29, 2026