आदर्श विवाह संपन्न

आहो आश्चर्य,मुलगी बघायला गेले,आणि विवाह लावुन आले..!

Risod Ideal marriage: रिसोड येथील चि.प्रदिप शालीकराम भालेकर आणि चि.सौ.शारदा आवटे यांचा विवाह अवघ्या पन्नास उपस्थितीत आणि साध्या पद्धतीने संपन्न झाला.

आहो आश्चर्य,मुलगी बघायला गेले,आणि विवाह लावुन आले..!

Risod Ideal marriage

भर जहागीर येथे आदर्श विवाह संपन्न झाला अवघ्या पन्नासांच्या उपस्थितीत

रिसोड (Risod Ideal marriage) : विवाह समारंभ हा एक दोन कुटुंबातील अतिशय महत्त्वपूर्ण संस्कारनिय योग आहे,परंतु हा महत्त्वपुर्ण विवाहाचा योग प्रत्येक कुटुंब आप,आपल्या परीस्थितीनुसार संपन्न करतात.कारण आज विवाहतुन प्रत्येक कुटुंब आपली श्रीमंती अधोरेखीत करीत आसल्याने नंतर डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणे साहाजिकच आहे.परंतु खर्चीक बाबीला पुर्णता आळा घालत भर जहागीर येथिल काही.मित्रांच्या सहकार्याने गावातील वराला वधु दाखवायला घेऊन गेले आणि चक्क अगदी साध्या पध्दतीने विवाह संस्कार संपन्न करीत एक आदर्श विवाह केला.

मागील पाच वर्षांपासून बहुतांश समाजातील उपवर युवकांना वधुसाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. प्रत्येक समाजातील वधुची कमी पाहाता.अनेकांना खोट्या,खोट्या विवाहाच्या गुळाला लावल्या जात आसल्याच्या घटना सुध्दा ताज्या आहेत.परंतु रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथिल चि.प्रदिप शालीकराम भालेकर या युवकाला त्यांचे काही मित्र नांदेड जिल्ह्य़ातील हादगांव येथिल वधु चि.सौ.शारदा आवटे यांना पाहण्यासाठी वराला सोबत घेऊन गेले,आणि चक्क "वधु पाहायला गेले,आणि (Risod Ideal marriage) विवाह करून आल्याची अल्हाददायक बाब घडली." भर जहागीर येथिल युवक प्रदीप भालेकर याला त्यांचे मित्र अशोक मांदळे,विष्णु कैलास नागरे विजय चोपडे,विठ्ठल आवचार,भगवान चोपडेजुबेरखा पठाण हे मित्र सहज नांदेड येथिल "गुरूद्वारा" पाहाण्यासाठी गेले आणि हादगांव येथिल वधु कडील काही मंडळीशी वरा संदर्भात सहज चर्चा झाली.कारण कुठल्याही आई-वडीला आपल्या उपवर वधु-वरांचे जिवण.विवाह संस्काराने मंगलमय करणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे.चर्चेतुन थेट वधुशी बोलणे झाले.

नांदेड जिल्ह्य़ातील हादगांव येथिल वधु थेट भर जहागीर येथे घेऊन येथे अवघ्या पाचपन्नास पाहुण्यांच्या उपस्थित थेट अवघ्या दोन तासात दोघांचा (Risod Ideal marriage) आदर्श विवाह संपन्न झाला,विशेष म्हणजे या आदर्श विवाहा मध्ये ना.घोडा,ना बॅन्डबाजा,ना कुठले डेकोरेश भर जहागीर येथिल शिवाजी शाळेच्या प्रांगणात आधीच्या एक विवाहाचा मंडप कायम आसल्याने मित्राच्या पुढाकाराने मंडपडेकोरेशन मालक भगवान मुरकुटे यांची मुकसंम्मती घेत अगदी मोफत मंडपडेकोरेशन उपलब्ध झाले.आणि ता.24 एप्रिल ला दुपारी 1 वाजता एक आदर्श विवाह संपन्न झाला, चि.संदिप भालेकर यांच्या साठी मित्र धाऊन आले आणि या एका आदर्श विवाहा साठी कवि मंगेश पाडगांवकरयांच्या कवितेतील ओळी "मित्र वणव्या मधी गारव्या सारखा" ख-या ठरल्याचा प्रत्येय आला.अवघ्या दोन तासातील संपन्न झालेल्या या आदर्श, विवाहाची पंचक्रोशीतील अनेक विवाह मध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे.कारण आशा प्रकारचे विवाह संपन्न करणे हे भविष्या साठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब ठरणार आहे.

संबंधित सामग्री

ज्येष्ठांचा सन्मान ही कायदेशीर जबाबदारी, दुर्लक्ष करणाऱ्या वारसांवर होणार कारवाई

ज्येष्ठांचा सन्मान ही कायदेशीर जबाबदारी, दुर्लक्ष करणाऱ्या वारसांवर होणार कारवाई

Officer Samadhan Ghutukade: ज्येष्ठांचे सन्मान करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी केंद्रीय अधिनियम २००७ लागू करण्यात उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांनी जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठांना आवाहन केला.

Jul 26, 2026
वृक्ष म्हणजे जीवनाचा संदेश; विकास हायस्कूल बॅच-2000 हेल्पिंग हँड ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम

वृक्ष म्हणजे जीवनाचा संदेश; विकास हायस्कूल बॅच-2000 हेल्पिंग हँड ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम

Helping Hand Group Initiative: विकास हायस्कूलचे माजी विद्यार्थी व विकसित हँड ग्रुपने श्रीराम सरोवर परिसरात ५०+ वृक्ष रोपण करीत पर्यावरण संरक्षणाची क्रीडा, धार्मिक स्थळाचे सौंदर्य वाढविण्यासाठी उपक्रम

Jul 13, 2026
सायबर पोलिस आणि ऑटो चालकामुळे वृद्धाला मिळाला दिलासा

सायबर पोलिस आणि ऑटो चालकामुळे वृद्धाला मिळाला दिलासा

Wardha Cyber ​​Police: वर्ध्यात ६० वर्षीय वृद्ध चंद्रशेखर वायुदेव भगत यांचा हरवलेला मोबाईल ऑटो चालक आणि सायबर पोलिसांच्या सहाय्याने परत मिळाला. सामाजिक जबाबदारीने मोबाईल थेट पोलिस स्टेशनला जमा

May 29, 2026
आ. संतोष बांगर यांच्या मदतीने चिमुकल्याच्या उपचाराला आधार

आ. संतोष बांगर यांच्या मदतीने चिमुकल्याच्या उपचाराला आधार

डोळ्याच्या गंभीर विकाराने त्रस्त असलेल्या एजाज मोहम्मद अली खान या चिमुकल्याला आमदार संतोष बांगर यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

May 12, 2026
तु. का. विद्यालय एनसीसी कॅडेट विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

तु. का. विद्यालय एनसीसी कॅडेट विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातुर येथील एनसीसी कॅडेट विद्यार्थ्यांनी श्री संत सिदाजी महाराज संस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.

Mar 30, 2026