महापालिका कर्मचारी आंदोलन

महापालिकेत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन!

Municipal Employees Protest: लातूर महानगरपालिका नगररचना विभागातील एक प्रकरण केल्याच्या कारणावरून नगरसेवकांसह काही लोकांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून लातूर महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटन

महापालिकेत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन!

Municipal Employees Protest

 

नगररचना विभागाचे तळदकर यांना मारहाण केल्याचा आरोप

लातूर (Municipal Employees Protest) : लातूर महानगरपालिका नगररचना विभागातील एक प्रकरण केल्याच्या कारणावरून नगरसेवकांसह काही लोकांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून लातूर महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने मंगळवारी काम बंद आंदोलन पुकारले. जोपर्यंत संबंधितावर प्रतिबंधात्मक कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशारा यावेळी संघटनेच्या नेत्यांनी बोलताना दिला. दरम्यान या( Municipal Employees Protest) प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक सायंकाळपर्यंत सुरू होती. याबाबत मिस्टर महापौरांना विचारले असता सकारात्मक चर्चा सुरू आहे, तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

लातूर महानगरपालिका नगररचना विभागाचे प्रमुख अक्षय तळदकर यांनी त्यांच्या विभागाकडे आलेले एक प्रकरण केले. हे प्रकरण का केले? असे म्हणत हे प्रकरण रद्द करा, अशी मागणी करत सोमवारी सायंकाळी साडेचार च्या सुमारास अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्या  केबिनमध्ये नगरसेवक अतिष चिकटे, विकास वाघमारे, सचिन गायकवाड, मनोज थोरात पोहोचले. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी नगररचना विभागाचे प्रमुख अक्षय तळदकर यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले होते. मात्र हे प्रकरण का केले? असे म्हणत या नगरसेवकांनी तळदकर यांना मारहाण केली, असा आरोप अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या संघटनेकडे लेखी निवेदनाद्वारे केला. 

या (Municipal Employees Protest) घटनेनंतर मंगळवारी सकाळी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी व कामगार संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. सोमवारी झालेली आहे या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली असून अशा वातावरणात काम करणे अवघड झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत संबंधितावर योग्य ती कारवाई होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना संघटनेच्या नेत्यांनी बोलून दाखविला.

दरम्यान याबाबत संघटनेने मंगळवारी आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष रवी कांबळे, उपाध्यक्ष बालाजी शिंदे, सचिव धोंडीबा सोनवणे, कोषाध्यक्ष अभिमन्यू पाटील आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती महापौर, उपमहापौर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थायी समिती व परिवहन समिती सभापती, गटनेता, विरोधी पक्षनेता व शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत.

'टाऊन प्लॅनिंग'कडील प्रकरणावरून मारहाण 

'टाऊन प्लॅनिंगकडील ते प्रकरण का केले?' अशी विचारणा करून आपण 'ते प्रकरण नियमानुसारच केले आहे,' असे सांगत असताना नगरसेवकांनी टाऊन प्लॅनिंगचे प्रमुख अक्षय तळदकर यांना मारहाण केली. या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी आपण संघटनांकडे केल्यानंतर संघटनांनी संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन केले आहे. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास माझ्या केबिनमध्ये सचिन गायकवाड, अतिष चिकटे, विकास वाघमारे, मनोज थोरात यांनी तळदकर यांना मारहाण केली, असा आरोप अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केला. 

संबंधित सामग्री

आंदोलक मनपा कर्मचार्‍यांनी रोखला वसमत महामार्ग

आंदोलक मनपा कर्मचार्‍यांनी रोखला वसमत महामार्ग

Municipal Employees Protest: कामबंद वर असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करत बुधवार २ सप्टेंबर रोजी महापालिका कार्यालया समोर वसमत रोडवर रास्ता रोको आंदोलन

Sep 02, 2026
परभणीत महिला सरपंचाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी; दोन भावांविरुद्ध गुन्हा

परभणीत महिला सरपंचाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी; दोन भावांविरुद्ध गुन्हा

पूर्णा तालुक्यातील सोनखेड येथे ग्रामसभा सुरू असताना गोंधळ घालत महिला सरपंचाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे

Aug 28, 2026
कळमनुरीत शासकीय भूमी अभिलेख कार्यालयात शिवीगाळ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कळमनुरीत शासकीय भूमी अभिलेख कार्यालयात शिवीगाळ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Kalamnuri Land Records Office: कळमनुरी पोलिस ठाण्यात चार जणांना गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सर्वांना शिवीगाळ करून शिरस्तेदारांना शासकीय कामांच्या अडचणीत भूमिका घेतली गेली.

Aug 25, 2026
जि.प. शाळेत विनापरवानगी प्रवेश; शिक्षकांना धमकावले!

जि.प. शाळेत विनापरवानगी प्रवेश; शिक्षकांना धमकावले!

CJP Abhijit Deepke: कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या २० ऑगस्ट रोजी झालेल्या लातूर जिल्हा दौऱ्यादरम्यान औसा शहरातील जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामकाजात अडथळा

Aug 23, 2026
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून, सोशल मीडियावर केली बदनामी 

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून, सोशल मीडियावर केली बदनामी 

Marriage Sexual Assault: पोलिस स्थानक हद्दीतील एका गावातील तरुणी सोबत प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले नंतर पुढे सदर तरुणी सोबत विविध फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी

Aug 19, 2026