Death Threat

परभणीत महिला सरपंचाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी; दोन भावांविरुद्ध गुन्हा

पूर्णा तालुक्यातील सोनखेड येथे ग्रामसभा सुरू असताना गोंधळ घालत महिला सरपंचाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे

परभणीत महिला सरपंचाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी; दोन भावांविरुद्ध गुन्हा

Death Threat

सोनखेड येथील ग्रामसभेत गोंधळ; सरपंचाच्या अंगावर धावून जात ग्रामसभा बरखास्त करण्याचा प्रयत्न

परभणी : पूर्णा तालुक्यातील सोनखेड येथे ग्रामसभा सुरू असताना गोंधळ घालत महिला सरपंचाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ग्रामसभा बरखास्त करण्याचा प्रयत्न करत सरपंचाच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप असून, याप्रकरणी दोन भावांविरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना गुरुवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सोनखेड येथे घडली. याप्रकरणी मुक्ताबाई सोपानराव सूर्यवंशी (वय ७७ वर्षे), रा. सोनखेड यांनी चुडावा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्या सोनखेडच्या सरपंच आहेत.

फिर्यादीनुसार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता सोनखेड ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक ठिकाणी ग्रामसभा सुरू होती. यावेळी आरोपींनी संगनमत करून ग्रामसभेत गोंधळ घातला. ग्रामसभा बरखास्त करण्याचा प्रयत्न करत महिला सरपंचांच्या अंगावर धावून जात त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

तसेच सरपंचांना त्यांचे सार्वजनिक कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय सरपंच आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी गणपत गोविंद सूर्यवंशी आणि धनाजी गोविंद सूर्यवंशी, दोघेही रा. सोनखेड, यांच्याविरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सपोनि किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कच्छवे पुढील तपास करीत आहेत.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
पाणी बचतीचे नियम शेतकऱ्यांसाठीच का?; खडकपूर्णा प्रकल्पातील अवैध रेती उपशाच्या बोटी बंद करा!

पाणी बचतीचे नियम शेतकऱ्यांसाठीच का?; खडकपूर्णा प्रकल्पातील अवैध रेती उपशाच्या बोटी बंद करा!

Khadakpurna Project Illegal sand dumping: जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना खडकपूर्णा प्रकल्पातील पाण्याच्या वापराबाबत प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत.

Oct 06, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026