लातूर निवडणूक 2026

लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणूक

Latur Election 2026: लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेने निवडणुकीसाठी माजी भाजप मंत्री बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख उमेदवारी दाखल केल्या.

लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणूक

Latur Election 2026

 

बसवराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल! 

लातूर (Latur Election 2026) : लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांनी सोमवारी (दि.१) भाजपाच्या वतीने धाराशिव येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते. याच मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाचे प्रमुख उमेदवार हे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील आहेत.

लातूर धाराशिव बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आणि औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बसवराज पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बसवराज पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील रहिवासी आहेत. औसा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या वतीने ते दोन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. उमरगा विधानसभेतून ते पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर त्यांनी ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. शांत, संयमी आणि नम्र स्वभाव असणारे बसवराज पाटील हे अगदी कणखर नेते म्हणून ओळखले जातात. मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेस मधून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा परिषदेत भाजपा व महायुतीची सत्ता आली.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी (Latur Election 2026) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या अखेरच्या दिवशी भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आ. राणाजगजीतसिंह पाटील, आ. अभिमन्यू पवार, आमदार सुरेश धस, आमदार रमेशआप्पा कराड, आमदार विक्रम काळे, अरविंद पाटील निलंगेकर, सौ. अर्चनाताई पाटील, ओमप्रकाश शेटे, धाराशिव चे भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, औशाचे माजी आमदार दिनकरराव माने, माजी खासदार सुनिल गायकवाड, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख, माजी आमदार सर्वश्री गोविंद केंद्रे, बब्रुवान खंदाडे तसेच बापूराव पाटील शरण पाटील, परिक्षीत पवार, दिलीपराव देशमुख, गणेश हाके यांच्यासह महायुतीचे स्थानिक नेते उपस्थित होते.

महायुती म्हणून आम्ही सर्व एकत्रच! 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना बसवराज पाटील म्हणाले देशात आणि राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचे काम होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मला उमेदवारी दिली हे मी माझे भाग्य समजतो. पक्षांमध्ये कुणीही नाराज नाही, सर्व आम्ही आनंदी आहोत आणि एकत्रित आहोत. त्यामुळे निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित सामग्री

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026
राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधी यांनी ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच केले. नागरिकांना तक्रारी व आंदोलनांची माहिती नोंदवता येणार असून, विविध संघर्ष डिजिटल नकाशावर जोडले जाणार आहेत.

Oct 03, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शिवराज मोरे यांच्या उमेदवारीची मागणी

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शिवराज मोरे यांच्या उमेदवारीची मागणी

Congress Shivraj More: आगामी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी

Oct 01, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

Congress candidate Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांची आढावा बैठक

Sep 29, 2026