भूमी अभिलेख कार्यालय

अकरा वर्षापासून न्याय मिळत नसल्याने भूमी अभिलेख कार्यालयासमोर शेतकऱ्याची आत्मदहनाची तयारी

Land Records Office: वसमत येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अडवणूकामुळे शेतकरी मारोतराव गंगाराम फेगडे यांनी १२ वर्षांपेक्षा जास्त काळाने दलित झाल्याने आत्मदहन

अकरा वर्षापासून न्याय मिळत नसल्याने भूमी अभिलेख कार्यालयासमोर शेतकऱ्याची आत्मदहनाची तयारी

Land Records Office

पोलिसांनी घेतले ताब्यात

वसमत (Land Records Office) : भूमिअभिलेख कार्यालयातील अडवणूक चव्हाट्यावर वसमत ॲड चंद्रकांत देवणे जमीनमोजणी प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव पाठवण्यासाठी शेतकऱ्याला वेठीस धरून त्रास देणाऱ्या वसमत भूमीअभिलेख कार्यालयासमोर मौजे रुखी येथील शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता सोमवारी आत्मदहन करण्यापूर्वी पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतले व आत्मदहनापासून परावृत्त केले गेल्या बारा वर्षापासून संबंधित शेतकरी या समस्येसंदर्भात झगडत आहे मात्र न्याय मिळत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने शेवटी आत्मदहनाचा इशारा दिला होता या प्रकाराने वसमत भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी व शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

वसमत तालुक्यातील मौजे रुखी येथील शेतकऱ्याने शेत जमिनीतील मोजणी संदर्भातदाखल 2012 मध्ये दाखल केलेल्या अपिलाचा निकाल 2015 मध्ये लागला मात्र संबंधित शेतकऱ्याला वसमत भूमी अभिलेख कार्यालयाकडून न्याय मिळाला नाही रुखी येथील गट नंबर 58, 62, 82 ,84 क्षेत्र दुरुस्ती प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला होता त्यात त्रुटी आल्या म्हणून प्रस्ताव परत आला गेल्या दीड वर्षापासून वसमत तालुका भूमि अभिलेख कार्यालयाच्या उपाधीक्षकांनी प्रस्तावातील त्रुटी दुरुस्त न करता प्रस्ताव अडवून ठेवला वयोवृद्ध शेतकरी मारोतराव गंगाराम फेगडे हे चकरा मारून वैतागून गेले आहेत त्यांनी अनेक वेळा भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून प्रस्तावातील उणिवांची पूर्तता करून प्रस्ताव पाठवण्यासाठी हात जोडून विनंती केल्या मात्र वयोवृद्ध शेतकऱ्याला वेठीस धरण्याचा प्रकार भूमी अभिलेख कार्यालयातून झाला.

गेल्या बारा वर्षापासून या समस्या संदर्भात झगडणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही दीड वर्षापासून त्रुटीची पूर्तता होत नाही त्यामुळे जिवंतपणी ही समस्या सुटणार नाही म्हणून शेवटी आत्मदहन करण्याचा निर्धार वयोवृद्ध शेतकरी मारोतराव गंगाराम फेगडे यांनी घेतला आत्मदहनाचा इशारा देणारे निवेदन त्यांनी दिले होते त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.

सोमवारी शेतकरी मारोतराव फेगडे हे आत्मदहन करण्याच्या इराद्याने वसमत कडे निघाले असता त्यांना वसमत शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले तेथे भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक गुरव यांनाही पाचारण करण्यात आले होते पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधीक्षक गुरव व पीडित वयोवृद्धशेतकरी मारोतराव फेगडे यांच्यात चर्चा झाली शेवटी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक गुरव यांनी पाच जून पर्यंत प्रस्ताव दुरुस्त करून पाठवणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे त्यानंतर शेतकऱ्याने आंदोलन थांबवले आहे या प्रकाराने  वसमत येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी व शेतकऱ्यांची आडवणूक होण्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे अनेक शेतकरी येथील कारभारा संदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशा तक्रारी आहेत ठराविक एकाच ऑनलाइन केंद्रावरून काम करून घेण्यासाठी फर्मान सोडले जाते त्या ऑनलाइनकेंद्रावर शेतकऱ्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल केले जातात दुसरीकडे गेले तर अधिकारी कर्मचाऱ्यांना जमत नाही अशा अनेक तक्रारी आहेत कोणी दखल घेत नसल्याने शेतकरी वैतागून गेलेले आहेत.

विश्वास राहिला नाही म्हणून मरण पत्करण्याची तयारी केली होती: पीडितशेतकरी फेगडे 

यासंदर्भात संबंधित शेतकरी मारोतराव फेगडे यांच्याशी देशोन्नतीने संपर्क साधला असता त्यांनी गेल्या बारा वर्षापासून या समस्येसाठी झगडत आहे अपीलाचा निकाल माझ्या बाजूने लागला तरी सुद्धा अधिकारी मुद्दाम चुकीचे प्रस्ताव पाठवून विलंब करत आहेत प्रस्तावातील त्रुटी दुरुस्त करून पाठवण्यासाठी वसमत येथील उपअधीक्षक गेल्या दीड-दोन वर्षापासून चालढकल करत आहेत जाणून बुजून हे प्रकार केले जात आहेत  या प्रकाराने हातबल झालो आहे त्यामुळे एवढ्या वयानंतर सुद्धा जर समस्या सुटत नसेल तर व जिवंतपणी आपण प्रश्न सोडवून घेत नसेलतर त्याच भूमी अभिलेख कार्यालयासमोरच मरण पत्करलेले बरे असा निश्चय करून आत्मदहनाचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला आता पाच जून पर्यंत समस्या मार्गी लावण्याचे लेखीआश्वासन दिले आहे त्यामुळे आंदोलन स्थगित केले आहे एकंदरीत व्यवस्थेवर आपलाविश्वास राहिला नसल्याची जळजळीतप्रतिक्रिया त्यांनी देशोन्नतीशी बोलताना दिली. 

संबंधित सामग्री

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
मानोरा येथील वारस नसलेल्या नझूल जमिनीवर बेकायदेशीर ताबा; चौकशी करून शासन जमा करण्याची मागणी! 

मानोरा येथील वारस नसलेल्या नझूल जमिनीवर बेकायदेशीर ताबा; चौकशी करून शासन जमा करण्याची मागणी! 

Illegal Nazul land: शहरातील जुनी वस्ती येथील नझूल शिट क्रमांक २, प्लॉट क्रमांक ९३, क्षेत्रफळ ७५.०० चौ.मी. (८०७ चौ.फूट) या मालमत्तेच्या मूळ मालक केसरसा सखबनसा ढोले यांचा सुमारे ३० वर्षांपूर्वी मृत्यू..

Sep 01, 2026
सुकळी सिंचन तलाव प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी पाडली बंद

सुकळी सिंचन तलाव प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी पाडली बंद

Sukali Irrigation Tank Project: तालुक्यातील सुकळी बुद्रुक येथे प्रस्तावित सुकळी सिंचन तलाव प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. जमीन मोजणीसाठी आलेल्या भूसंपादन विभाग..

Aug 21, 2026
शक्तीपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध; मोजणी प्रक्रिया पाडली बंद

शक्तीपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध; मोजणी प्रक्रिया पाडली बंद

MLA Santosh Bangar: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शेतकर्यांनी शक्तिपीठ महामार्गावरील कंपनी कर्मचारियोंच्या मोजणी प्रक्रियाला विरोध केला. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पथक

Aug 13, 2026
कोटगुलमधील आदिवासींच्या गंभीर प्रश्नांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक

कोटगुलमधील आदिवासींच्या गंभीर प्रश्नांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक

BJP Yuva Morcha: नगरपरिषद सांस्कृतिक भवन, देसाईगंज (वडसा) येथे झालेल्या आढावा बैठकीत कोरची तालुक्यातील कोटगुल व परिसरातील आदिवासी बांधवांच्या प्रलंबित व गंभीर प्रकरणांबाबत भाजप युवा मोर्चा

Aug 12, 2026