सुकळी सिंचन तलाव प्रकल्प

सुकळी सिंचन तलाव प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी पाडली बंद

Sukali Irrigation Tank Project: तालुक्यातील सुकळी बुद्रुक येथे प्रस्तावित सुकळी सिंचन तलाव प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. जमीन मोजणीसाठी आलेल्या भूसंपादन विभाग..

सुकळी सिंचन तलाव प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी पाडली बंद

Sukali Irrigation Tank Project

 

उपविभागीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव प्रकल्प रद्द करण्याची मागणी

सेनगाव (Sukali Irrigation Tank Project) : तालुक्यातील सुकळी बुद्रुक येथे प्रस्तावित सुकळी सिंचन तलाव प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. जमीन मोजणीसाठी आलेल्या भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी घेराव घालत मोजणीचे काम तात्काळ बंद पाडले आहे ​प्रशासनाकडून शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच जमिनीचे संपादन केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

या (Sukali Irrigation Tank Project) प्रकल्पामुळे सुकळी बुद्रुकसह परिसरातील चार गावांतील शेतकऱ्यांची सुपीक शेतजमीन पाण्याखाली जाण्याची भीती आहे. जमिनी गेल्यास शेतकऱ्यांवर थेट उपासमारीची वेळ येईल, असा इशारा देत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

​यावेळी घटनास्थळी दाखल झालेले उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनाही शेतकऱ्यांनी घेराव घातला. हा प्रकल्प तात्काळ रद्द करा, अन्यथा आमच्यावर गोळ्या घाला, अशी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे.