पुर्णा पाटबंधारे विभाग

एक हजाराची लाच स्विकारणारा पुर्णा पाटबंधारे विभागातील लाचखोर वरिष्ठ लिपीक निलंबित

Purna Irrigation Department: वरिष्ठ लिपिक सलीम अब्दुल अहमद शेख यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ, नांदेड पाटबंधारे मंडळाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता पारसेवार यांनी निलंबनाचे आदेश काढले.

एक हजाराची लाच स्विकारणारा पुर्णा पाटबंधारे विभागातील लाचखोर वरिष्ठ लिपीक निलंबित

Purna Irrigation Department

नांदेड पाटबंधारे मंडळाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता सु.ब. पारसेवार यांनी काढले आदेश

हिंगोली (Purna Irrigation Department) : पुर्णा पाटबंधारे विभाग वसमत येथील वरिष्ठ लिपिक सलिम अब्दुल अहमद शेख यास कर्मचार्‍याच्या तीन महिन्याचे वेतन बील तयार करून त्यावर उपकार्यकारी अभियंत्याची स्वाक्षरी आणि कोषागार कार्यालयात जमा केल्याबद्दलचा मोबदला म्हणुन १ हजार रुपयाच्या लाचेची मागणी स्विकारताना २३ मार्चला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणात वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे लाचखोर वरिष्ठ अभियंत्याच्या निलंबनाचे आदेश पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता सु.ब. पारसेवार यांनी काढले. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुर्णा पाटबंधारे विभाग सिंचन व्यवस्थापन विभागातील एका कर्मचार्‍याचे जुलै ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत थकीत देयकाची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी पुर्णा पाटबंधारे विभाग (Purna Irrigation Department) वसमत कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सलिम अब्दुल अहमद शेख यांनी सदर कर्मचार्‍याकडे १ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. लाच देणे मान्य नसल्याने २३ मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता त्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली.

त्यावरून २३ मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला असता वरिष्ठ लिपीक सलीम अब्दुल अहमद शेख याला पुर्णा पाटबंधारे विभागातील त्यांच्या कक्षात लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. या (Purna Irrigation Department) प्रकरणात वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये आरोपी सलीम अब्दुल यास पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्याने परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुर्णा पाटबंधारे विभागाकडे केला होता. त्यावरून ३० मार्चला नांदेड पाटबंधारे मंडळाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता सु.ब. पारसेवार यांनी वरिष्ठ लिपिक शेख सलीम अब्दुल अहमद याच्या निलंबनाचे आदेश काढले.

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

Oct 04, 2026
FCRA लाचखोरी प्रकरणात गृह मंत्रालयाचे दोन अधिकारी ताब्यात; नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप

FCRA लाचखोरी प्रकरणात गृह मंत्रालयाचे दोन अधिकारी ताब्यात; नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप

FCRA नोंदणी आणि लायसन्स रिन्यूच्या बदल्यात लाच मागितल्याच्या आरोपावरून गृह मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांना दिल्लीत रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

Sep 30, 2026
FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; संजय राऊतांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर.

Sep 29, 2026
‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

‘क्लोजिंग नोटिस’च्या नावाने वसुली? संजय राऊतांची तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी

संजय राऊतांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढेंना पत्र लिहून अधिकाऱ्यांकडून कथित वसुली आणि ‘क्लोजिंग नोटिस’ प्रकरणांची स्वतंत्र चौकशी मागितली.

Sep 28, 2026