तरुण कामगार मृत्यू

कुरुंदा येथे इमारतीवरून पडून तरुण कामगाराचा मृत्यू

Young Worker Death: कुरुंदा येथे टॉवरचे काम सुरु असताना इमारतीवरून तोल जाऊन खाली पडल्याने एका तरुण कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली.

कुरुंदा येथे इमारतीवरून पडून तरुण कामगाराचा मृत्यू

Young Worker Death

कुरुंदा/ हिंगोली (Young Worker Death) : कुरुंदा येथे टॉवरचे काम सुरु असताना इमारतीवरून तोल जाऊन खाली पडल्याने एका तरुण कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव संदीप माधव काळे (वय २५, रा. गणेश नगर, कुरुंदा) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरुंदा येथील जामवाडी गल्लीत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. संदीप हा मिस्त्रीच्या हाताखाली मजूर म्हणून काम करत होता. इमारतीवर काम करत असताना अचानक तोल जाऊन तो जमिनीवर कोसळला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.

त्याला तात्काळ कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तेथून पुढील उपचारासाठी वसमत येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Young Worker Death) वसमत येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

संदीप याच्या पश्चात आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची अद्याप पोलिसांत नोंद झालेली नसून पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित सामग्री

कोरोनानंतर नवा धोका? रशियात न्यूमोनिक प्लेगचा संशय, प्रशासन सतर्क

कोरोनानंतर नवा धोका? रशियात न्यूमोनिक प्लेगचा संशय, प्रशासन सतर्क

रशियात २७ वर्षीय लॅब कर्मचाऱ्याचा गंभीर न्यूमोनियामुळे मृत्यू झाला. न्यूमोनिक प्लेगचा संशय असून २०० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Oct 05, 2026
रासायनिक पाणी अंगावर उडाल्यानंतर कामगाराचा मृत्यू; बेंजो कंपनीतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

रासायनिक पाणी अंगावर उडाल्यानंतर कामगाराचा मृत्यू; बेंजो कंपनीतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Benjo Company Worker Death: बेंजो केमिकल कंपनीत काम करत असताना ईटीपीमधील रासायनिकयुक्त पाणी अंगावर व तोंडावर उडाल्याने एका ३३ वर्षीय कायमस्वरूपी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना

Oct 01, 2026
मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; 2 जणांचा मृत्यू? 7 ते 8 कामगार जखमी

मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; 2 जणांचा मृत्यू? 7 ते 8 कामगार जखमी

मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असून जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे.

Sep 21, 2026
परभणीत मराठा आरक्षणाच्या विवंचनेत देवगाव फाटा येथील तरूणाची आत्महत्या

परभणीत मराठा आरक्षणाच्या विवंचनेत देवगाव फाटा येथील तरूणाची आत्महत्या

Parbhani Youth Suicide: मराठा आरक्षण कधी मिळणार या विवंचनेत ३४ वर्षीय तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी देवगाव फाटा शिवारात उघडकीस आली.

Aug 30, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये भूमिगत डक्टमध्ये दोन कामगारांचा मृत्यू; वर्षभरात एकाच ठिकाणी ५ बळी

पिंपरी-चिंचवडमध्ये भूमिगत डक्टमध्ये दोन कामगारांचा मृत्यू; वर्षभरात एकाच ठिकाणी ५ बळी

निगडी परिसरातील भूमिगत डक्टमध्ये काम करताना गुदमरल्याने दोन तरुण कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Aug 27, 2026