Kotgul PHC

विद्यार्थिनीच्या मृत्यूला डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत? १० लाखांच्या मदतीसह गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला .

विद्यार्थिनीच्या मृत्यूला डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत? १० लाखांच्या मदतीसह गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्राविरोधात गंभीर आरोप; ४ ऑगस्टपर्यंत आर्थिक मदत न दिल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा

कोरची : कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील  वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील संबंधित डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष अनिल केरामी यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोटगुल येथील रहिवासी असलेली विद्यार्थिनी संजना जाळे हिला तापाची तक्रार असल्याने कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर ती P.V. Positive (मलेरिया) असल्याचे निदान झाले. मात्र, योग्य वेळी उपचार आणि रेफरल न दिल्यामुळे तिची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच विद्यार्थिनीचे हिमोग्लोबिन ३.४ इतके अत्यंत कमी असतानाही तिला तातडीची वैद्यकीय मदत तसेच उच्चस्तरीय उपचारासाठी वेळेत हलविण्यात आले नाही. याच निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणात OPD रजिस्टरमध्ये फेरफार झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः १८ जुलै रोजीच्या नोंदींमध्ये विसंगती असल्याचा दावा करण्यात आला असून संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५, १०६ आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शासनाने किमान १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच ४ ऑगस्टपर्यंत आर्थिक मदत न दिल्यास संबंधित शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेतील कथित हलगर्जीपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री अशोक ऊईके, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026
नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

कोरचीच्या वार्ड क्रमांक १६ मध्ये नगरपंचायतीच्या नळातून मीटरभराचा नाळू निघाल्याचा प्रकार समोर आला असून, पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sep 24, 2026
स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ एसटी बस पलटली.

Sep 18, 2026
खानापूर चित्ता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हालचालींना आला वेग..

खानापूर चित्ता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हालचालींना आला वेग..

Khanapur Primary Health Centre: खानापूर चित्ता येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीची व्हावी अशी मागणी पूर्ण होत असल्याचे दिसत आहे. परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्राथमिक आरोग्य

Sep 16, 2026
शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीने पाठवली केवळ १० जनावरे!

शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीने पाठवली केवळ १० जनावरे!

कोरची शहरात शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला असून, चार-पाच वर्षांपासून निवेदने देऊनही समस्या कायम आहे. नगरपंचायतीने केवळ १० जनावरे गोशाळेत पाठवल्याने नागरिक संतप्त आहेत.

Sep 10, 2026