Kharif Crops

पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सहकार मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हिंपळनेर परिसरातील खरीप पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य सरकार पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सहकार मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

Kharif Crops

हिंपळनेर परिसरातील खरीप पिकांची केली पाहणी; अडचणी जाणून घेत शेतकऱ्यांना दिलासा

चाकूर : तालुक्यातील हिंपळनेर परिसरात पावसाअभावी निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची सद्यस्थिती, झालेली नुकसानीची तीव्रता आणि शेतीसमोरील अडचणी जाणून घेतल्या.

पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढावले आहे. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केल्याने शेतकऱ्यांमध्ये शासन आपल्या अडचणी समजून घेत असल्याची भावना निर्माण झाली.

पाहणीदरम्यान मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चाकूर तालुक्यातील पीक परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, गटविकास अधिकारी संतोष माने, तालुका कृषी अधिकारी शिवचंद्रपाल जाधव, सभापती प्रतिनिधी मच्छिंद्र नागरगोजे, उपसभापती भुजंग शिंदे, राहुल सुरवसे, पंचायत समिती गटनेते गजानन होनराव, नगराध्यक्ष भागवत फुले यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026