प्रधानमंत्री आवास योजना

आवास योजनेच्या ऑनलाइन प्रक्रियेत अपात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावे! 

PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०२५ - २६ च्या यादीत कोलार, सोमनाथनगर, गव्हा, आमगव्हाण, दापुरा बु या गावांसह तालुक्यातील अनेक गावांतील पात्र लाभार्थींची निवड यादी ऑनलाईन

आवास योजनेच्या ऑनलाइन प्रक्रियेत अपात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावे! 

PM Awas Yojana

 

अपिलीय यादी तयार करून मंजुराती देण्याची मागणी!

मानोरा (PM Awas Yojana) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०२५ - २६ च्या यादीत कोलार, सोमनाथनगर, गव्हा, आमगव्हाण, दापुरा बु या गावांसह तालुक्यातील अनेक गावांतील पात्र लाभार्थींची निवड यादी ऑनलाईन झाली नसल्याने त्या लाभार्थ्यांना अपिलीय यादी तयार करून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत सामावून घेत न्याय देण्याची मागणी गटविकास अधिकारीसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ छाया राठोड यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.  
         
दिलेल्या निवेदनात केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास ग्रामीण घरकुल योजनेपासून (PM Awas Yojana) वंचित पात्रं लाभार्थींची निवड यादी सन २०२५ - २६ च्या ग्रामसेवक व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्या मार्फत सर्वेक्षण करून तयार करण्यात आलेल्या यादीला दि १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्टच्या ग्रामसभेत मंजूरी दिलेल्या यादीतील अनेक लाभार्थींची नांवे ऑनलाइन झाली नसल्याने अनेक लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. कोलार येथील २०१ नागरिकांची निवड यादी ऑनलाईन अपलोड केली असता त्यातील फक्त ५८ लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन झाल्याने उर्वरित १४३ लाभार्थी वंचित राहत असल्याने ते लाभार्थी स्थानिक ग्रामसेवक सरपंच व पंचायत समितीच्या कार्यालयांची वारी करीत आहे.

असाच प्रकार गव्हा सोमनाथनगर, आमगव्हाण दापुरा बु सह अनेक गावातही झाल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे पात्र लाभार्थ्यात चिंतेचे कारण बनले आहे. तेव्हा ऑनलाइन न झालेल्या लाभार्थ्यांची अपिलीय यादी तयार करून त्यामध्ये या अपात्र लोकांना घरकुल योजनेच्या लाभ देण्याची मागणी पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ छाया राठोड सह जयराम चव्हाण, चिंतामण चव्हाण, गणेश चव्हाण, वसंता चव्हाण, गणेश चव्हाण, संजय चव्हाण, सुभाष चव्हाण, शुभम चव्हाण, प्रदीप रमेश चव्हाण,अरुण चव्हाण, वनराम चव्हाण, सौ. सुदलबाई चव्हाण लाभार्थ्यांनी निवेदन देऊन  केली आहे.

संबंधित सामग्री

बीडमध्ये ग्रामरोजगार सेवक ३ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

बीडमध्ये ग्रामरोजगार सेवक ३ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

लाच स्वीकारताना केज तालुक्यातील बनसारोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामरोजगार सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Aug 08, 2026
मानोरा तालुक्यात घरकुल योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप; चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

मानोरा तालुक्यात घरकुल योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप; चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

प्रा. ओम बोलोदे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी ३ ऑगस्ट रोजी गट विकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांना निवेदन सादर केले.

Aug 03, 2026
हिंगोलीत पंतप्रधान आवास योजनेची पहिली यादी जाहीर; 84 हजार 293 लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ

हिंगोलीत पंतप्रधान आवास योजनेची पहिली यादी जाहीर; 84 हजार 293 लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ

PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली.

Jul 26, 2026
शेतकरी अनुदान प्रकरणी कार्यवाही न झाल्यास २४ जुलै रोजी आंदोलन

शेतकरी अनुदान प्रकरणी कार्यवाही न झाल्यास २४ जुलै रोजी आंदोलन

Farmer subsidy Case: शेतकारांनी कळमनुरीत अनुदान घोटाळ्याच्या आघाडीवर रास्ता रोकण्यासाठी आंदोलन केले. अतिवृष्टीच्या नुकसानातून शेतकऱ्यांना मदत न मिळावयाचे आरोप

Jul 10, 2026