PM Awas Yojana

पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी 'सूर्य घर मोफत वीज योजने'चा लाभ घ्यावा; गटविकास अधिकारी पल्लवी लांडे यांचे आवाहन

'प्रधानमंत्री सूर्य घर : मोफत वीज योजना'

पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी 'सूर्य घर मोफत वीज योजने'चा लाभ घ्यावा; गटविकास अधिकारी पल्लवी लांडे यांचे आवाहन

रिसोड : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन २०२४-२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षांमध्ये मंजूर घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या नव्याने बांधलेल्या घरावर 'प्रधानमंत्री सूर्य घर : मोफत वीज योजना' अंतर्गत छतावरील सौर ऊर्जा प्रणाली (Rooftop Solar) बसवून शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती रिसोडच्या गटविकास अधिकारी पल्लवी लांडे यांनी केले आहे.

वीज बिलातून होणार मुक्ती, पर्यावरणालाही मिळणार हातभार

पंचायत समिती रिसोड अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या आणि नवीन घराचे बांधकाम पूर्ण केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांच्या वीज बिलात मोठी बचत होण्यास मदत होणार असून, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेचा वापर वाढण्यासही चालना मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विद्यमान नियमांनुसार आकर्षक अनुदान (Subsidy) उपलब्ध करून दिले जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

याबाबत गटविकास अधिकारी पल्लवी लांडे म्हणाल्या, "ऊर्जा बचत, आर्थिक बचत आणि स्वच्छ भारताच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. रिसोड तालुक्यातील सर्व पात्र घरकुल लाभार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या हक्काच्या घरावर सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करावी."

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026