हिंगोली काँग्रेस आंदोलन

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील लाठीमाराच्या निषेधार्थ हिंगोलीत काँग्रेसचे धरणे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Hingoli Congress Protest: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमार आणि अश्रुधुराच्या वापराचा निषेधार्थ काँग्रेस आंदोलन

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील लाठीमाराच्या निषेधार्थ हिंगोलीत काँग्रेसचे धरणे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Hingoli Congress Protest

हिंगोली (Hingoli Congress Protest) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमार आणि अश्रुधुराच्या वापराचा निषेध करण्यासाठी आज हिंगोली शहरातील इंदिरा गांधी पुतळ्यासमोर हिंगोली जिल्हा काँग्रेस,शहर काँग्रेस, भिमशक्ती व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

जंतर-मंतर येथील आंदोलना दरम्यान विद्यार्थी, विद्यार्थिनी व तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रुधूर सोडण्यात आला. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते मा. खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले. मात्र हिंगोली शहर पोलिसांनी तो बॅनर तात्काळ हिसकावून घेतला. 

या आंदोलनात हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, माजी जिल्हाध्यक्ष सुरेशआप्पा सराफ, शहराध्यक्ष मिलिंद उबाळे, प्रदेश काँग्रेसचे जक्की कुरेशी, शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव बंटी नागरे, भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदिपके, युवक जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले, औंढा तालुका अध्यक्ष ॲड. प्रदीप पोले, वसमत तालुका अध्यक्ष ॲड. ऋषिकेश देशमुख, आरपीआय अध्यक्ष दिनेश हनुमंते, माजी जि.प. सदस्य भगवान खंदारे, कळमनुरी नगरसेवक शेख महेबूब बाबा भाई यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलन कर्त्यांनी केंद्र सरकारच्या विद्यार्थी विरोधी धोरणाचा निषेध केला आणि जखमी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

संबंधित सामग्री

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

NEET प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाशी संबंधित कॉक्रोच जनता पार्टीच्या 13 एफआयआरवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला.

Sep 01, 2026
'खाऊन-पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो'आदिवासी विद्यार्थ्यांना नरहरी झिरवळ  यांचा अजब सल्ला

'खाऊन-पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो'आदिवासी विद्यार्थ्यांना नरहरी झिरवळ यांचा अजब सल्ला

पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन आणि उपोषण १४व्या दिवशीही कायम आहे.

Aug 27, 2026
पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पेलेट गनच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Aug 21, 2026