कामगार कल्याण मंडळ

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त कन्हानमध्ये वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Labor Welfare Board: कामगार कल्याण मंडळाच्या सादर कार्यक्रमात कन्हान येथे पोलिस स्टेशन आणि पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात वृक्षांना उभारण्यात आले. महत्त्वाचे व्यावहारिक संदेश

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त कन्हानमध्ये वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

कन्हान (Labor Welfare Board) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार कल्याण केंद्र, कन्हान च्या वतीने कन्हान पोलीस स्टेशन तसेच पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात वृक्षारोपण करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
             
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्हान पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणुन नगरसेवक हरिष तिडके, कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकुमार हातझाडे, सुहास पुंडे, शंकर नुरकर, शशांक राणे तसेच समाजसेविका स्नेहल राणे उपस्थित होते. कार्यक्रमा च्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे वृक्ष भेट देऊन स्वाग त करण्यात आले. त्यानंतर कन्हान पोलीस स्टेशन व पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करताना, "वृक्ष हे पर्यावरणाचे खरे रक्षक असुन प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावुन त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. (Labor Welfare Board) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणा सोबतच वृक्षसंवर्धनालाही तितकेच महत्त्व द्यावे," असा प्रेरणा दायी संदेश दिला. कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख रंजना पौणीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेमा कावळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित सामग्री

चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीत जयस्तंभ चौक ते खामगाव चौफुली मार्गावर सुरू असलेल्या वृक्षलागवडीची नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पाहणी करून वृक्षसंवर्धनाच्या सूचना दिल्या.

Sep 17, 2026
२७ ऑगस्टला जागतिक तलाव दिन; तलाव आहेत म्हणून पाणी आहे! जाणून घ्या संवर्धनाचे महत्त्व

२७ ऑगस्टला जागतिक तलाव दिन; तलाव आहेत म्हणून पाणी आहे! जाणून घ्या संवर्धनाचे महत्त्व

२७ ऑगस्ट हा दिवस जगभरात ‘जागतिक तलाव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Aug 27, 2026
हिंगोलीत ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ

हिंगोलीत ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ

मृद व जलसंधारण, पाणी बचत, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हिंगोली शहरात ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

Aug 21, 2026
पिंपळदरी-फुलदाभा मार्गावरील वृक्ष लागवडीचा लाखो रुपयांचा निधी वाया; दुसऱ्याच दिवशी झाडे भुईसपाट

पिंपळदरी-फुलदाभा मार्गावरील वृक्ष लागवडीचा लाखो रुपयांचा निधी वाया; दुसऱ्याच दिवशी झाडे भुईसपाट

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी ते फुलदाभा या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा दोन दिवसांपूर्वी मोठ्या थाटात वृक्ष लागवड करण्यात आली होती.

Aug 06, 2026