औसा मुस्लिम बांधव

'हे देवा, आम्हा पाप्यांसाठी नव्हे, तर किमान या मुक्या जनावरांसाठी तरी पाऊस पडू दे!'

Ausa Muslim community: तालुक्यातील भादा येथे मुस्लिम बांधवांनी पाऊस यावा, यासाठी ईदगाह मैदानावर बुधवारी (दि.९)  सकाळी ९ वाजता विशेष नमाज अदा केली. यात प्रार्थना करताना येथील ईमाम समीर मौलाना

'हे देवा, आम्हा पाप्यांसाठी नव्हे, तर किमान या मुक्या जनावरांसाठी तरी पाऊस पडू दे!'

Ausa Muslim community

 

पावसासाठी मुस्लिम बांधवांनी अदा केली नमाज-ए-इस्तिस्का!

औसा (Ausa Muslim community) : औसा तालुक्यातील भादा येथे मुस्लिम बांधवांनी पाऊस यावा, यासाठी ईदगाह मैदानावर बुधवारी (दि.९)  सकाळी ९ वाजता विशेष नमाज अदा केली. यात प्रार्थना करताना येथील ईमाम समीर मौलाना यांनी 'पाऊस आमच्यासाठी नव्हे, तर किमान या मुक्या प्राण्यांसाठी तरी पडू दे!' अशी आर्त हाक ईश्वराकडे केली. यावेळी मोठ्या संख्येत मुस्लिम बांधव उपस्थित होते. यात अनेक हिंदू बांधवांनीही आपला सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे या प्रार्थनेसाठी मुक्या प्राण्यांनाही प्रार्थना स्थळी घेऊन गेले होते. सर्वत्र पावसाने ओढ दिल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसासाठी मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे प्रार्थना करत नमाज-ए-इस्तिस्का अदा केली.

मुस्लिम बांधव (Ausa Muslim community) मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज अदा केली.यावेळी इमामांनी पावसासाठी विशेष दुआ केली. दुष्काळसदृश परिस्थिती दूर होऊन परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळावे तसेच सर्व नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. नमाजीनंतर उपस्थितांनी हात उंचावून पावसासाठी दुआ केली. अल्लाहने रहमत बरसवून भरपूर पाऊस द्यावा, अशी आर्त विनवणी यावेळी करण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजातील नागरिक, युवक व ज्येष्ठ बांधव तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.