जिंतूर नगर परिषद

परभणीतील जिंतूर नगर परिषदेकडून अवैध व्यवसायावर कारवाई...!

Jintoor Municipal Council: परभणीतील जिंतूर नगर परिषदेने मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व्यवसायावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत

परभणीतील जिंतूर नगर परिषदेकडून अवैध व्यवसायावर कारवाई...!

Jintoor Municipal Council

तीन दिवसांत बंद करण्याचे आदेश; मोकळ्या जागेवरील अनधिकृत दारू विक्रीवर प्रशासनाचा बडगा

परभणी (Jintoor Municipal Council) : जिंतूर  येथील नगर परिषद प्रशासनाने शहरातील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नगर परिषदेकडून संबंधित व्यक्तीस नोटीस बजावून तीन दिवसांच्या आत व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा संबंधित दुकान सील  करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा गुरूवार २३ एप्रिल रोजीच्या नोटीस नुसार  देण्यात आला आहे.

नगर परिषद कार्यालय, जिंतूर (Jintoor Municipal Council) यांच्याकडून गुरूवार २३ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, शहरातील मोकळी जागा क्रमांक १९ व २० वर अनधिकृतपणे ‘देशी व विदेशी दारू विक्री (सदानंद वाईन शॉप)’ नावाने व्यवसाय सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या संदर्भात अर्जदार अविनाश श्रीरंग घ्याळ यांच्यासह विविध पत्रव्यवहार आणि पोलीस स्टेशन जिंतूर यांच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

नगर परिषद प्रशासनाने (Jintoor Municipal Council) स्पष्ट केले आहे की, नगर परिषद मालकीच्या जागेवर कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय करण्यास ना हरकत प्रमाणपत्र किंवा परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित व्यवसाय हा पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोटीसमध्ये पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत अवैध व्यवसाय बंद करून जागा मोकळी करावी. अन्यथा नगर परिषद प्रशासनाकडून थेट कारवाई करून सील करून हटविण्यात येईल आणि त्याचे सर्व परिणाम संबंधित व्यक्तीवर राहतील. दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यवसायांवर अंकुश बसणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

Vehicle E-challan: वाहतूक नियमांचे उल्लंघन करून आकारण्यात आलेला ई-चालानाचा दंड वेळेत न भरल्यास वाहनधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. बकाया वाहतूक दंडाची प्रभावीपणे वसुली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय

Oct 02, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026