Instagram Friend

इन्स्टाग्रामवरील ओळखीचं भीषण रूप; 16 वर्षीय मुलीची 24 तासांनंतर सुटका, 19 वर्षीय तरुण अटकेत

सोशल मीडियावरील ओळख किती धोकादायक ठरू शकते, याचे धक्कादायक उदाहरण नागपुरात समोर आले आहे.

इन्स्टाग्रामवरील ओळखीचं भीषण रूप; 16 वर्षीय मुलीची 24 तासांनंतर सुटका, 19 वर्षीय तरुण अटकेत

ऑनलाइन मैत्रीतून विश्वास संपादन, नागपुरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये अल्पवयीन मुलीला ओलीस ठेवल्याचा आरोप; हुडकेश्वर पोलिसांची धाडसी कारवाई, विशेष POCSO न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

नागपूर: सोशल मीडियावरील ओळख किती धोकादायक ठरू शकते, याचे धक्कादायक उदाहरण नागपुरात समोर आले आहे. इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून मैत्री झालेल्या 19 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला नागपुरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुमारे 24 तास ओलीस ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी तातडीने कारवाई करत फ्लॅटचे दार फोडून मुलीची सुटका केली आणि आरोपीला ताब्यात घेतले.

तपासानुसार, ठाण्यातील एका प्रसिद्ध डॉक्टरचा मुलगा असलेल्या आरोपीने स्वतःची ओळख 'आकाश मेहरा' या खोट्या नावाने करून पीडित मुलीशी इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर संपर्क वाढवला. हळूहळू त्याने मुलीचा विश्वास जिंकत तिच्या मोबाईलवरील पॅरेंटल कंट्रोल देखील आपल्या ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.

1 ऑगस्ट रोजी आरोपी नागपुरात आला. दिघोरी परिसरात एका ॲपद्वारे भाड्याने फ्लॅट घेतल्यानंतर त्याने हा संपूर्ण कट रचल्याचा आरोप आहे.

दरम्यान, बारावीत शिक्षण घेणारी ही विद्यार्थिनी रविवारी सकाळी मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र 20 तासांहून अधिक काळ ती घरी परतली नाही आणि तिचा मोबाईलही बंद असल्याने तिच्या पालकांनी तत्काळ हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तांत्रिक तपासादरम्यान मुलीच्या घरच्या लँडलाईनवर आलेल्या संशयास्पद फोनची तसेच तिच्या इन्स्टाग्राम चॅटची तपासणी करण्यात आली. सायबर पथकाने आरोपीचा ठाण्यातील पत्ता आणि त्याच्या आईचा मोबाईल क्रमांक शोधून काढला. त्यानंतर नागपूर पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या आईमार्फत त्याच्याशी संपर्क साधला.

फोन सुरू होताच सायबर तज्ज्ञांनी आरोपीचे लोकेशन नागपुरातील दिघोरी परिसरात निश्चित केले. याच वेळी आरोपीने ऑनलाइन फूड ऑर्डर केली होती. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयच्या मदतीने संबंधित फ्लॅटपर्यंत पोहोचत कारवाई केली.

फ्लॅटचे दार तोडून आत प्रवेश केल्यानंतर पोलिसांना मुलगी गंभीर अवस्थेत आढळली. तिचे हात बेडच्या रेलिंगला बांधलेले होते आणि आरोपी तिच्या गळ्यावर चाकू ठेवून उभा असल्याचा आरोप आहे. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत आरोपीला पकडले आणि मुलीची सुरक्षित सुटका केली.

तपासात पुढे असेही समोर आले की, या 24 तासांच्या काळात मुलीवर गंभीर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. तिच्या शरीरावर चाकूने वार केल्याचे तसेच धातूचे खिळे असलेल्या लेदरच्या पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. याशिवाय लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याचा आणि त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याचा आरोपही पोलिसांनी नोंदवला आहे. घटनास्थळावरून ऑनलाइन मागवलेले सेक्स टॉईज, हॅण्डकफ्स, लेदरचे पट्टे आणि नागपुरातून खरेदी केलेले चाकू जप्त करण्यात आले आहेत.

पीडित मुलीला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती मानसिक धक्क्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून डीएनए नमुने, फिंगरप्रिंट्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.

या प्रकरणात नागपूरच्या विशेष POCSO न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. झोन 4 च्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी पत्रकार परिषदेत तपासाची माहिती दिली. आरोपी BBAचा विद्यार्थी असून, त्याने हे कृत्य एखाद्या चित्रपट किंवा वेब सिरीजमधून प्रेरणा घेऊन केले की त्यामागे अन्य कारणे आहेत, याचा सखोल तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026