लातूर आरोग्य सेवा

आयएमएची २० जुलैला बंदची हाक; डोंबिवली हल्ल्याच्या निषेधार्थ लातूरमध्येही आरोग्य सेवा राहणार बंद 

Latur Health Services: इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रच्या हाकेला प्रतिसाद देत आयएमए लातूर शाखेतर्फे २० जुलै रोजी सकाळी ६ ते २१ जुलै रोजी सकाळी ६ या कालावधीत २४ तासांचे आंदोलन

आयएमएची २० जुलैला बंदची हाक; डोंबिवली हल्ल्याच्या निषेधार्थ लातूरमध्येही आरोग्य सेवा राहणार बंद 

Latur Health Services

लातूर (Latur Health Services) : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रच्या हाकेला प्रतिसाद देत आयएमए लातूर शाखेतर्फे २० जुलै रोजी सकाळी ६ ते २१ जुलै रोजी सकाळी ६ या कालावधीत २४ तासांचे आंदोलन करण्यात येणार असून यात सर्व पॅथींचे डॉक्टर्स तसेच पॅरामेडीकल तसेच आरोग्य सेवेशी सर्व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती आयएमए लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत आणि सचिव डॉ. विश्रांत भारती यांनी दिली. या आंदोलनादरम्यान आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत.

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हिंसाचारामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. (Latur Health Services) आरोग्यसेवेवरील हिंसाचाराविरोधात शून्य सहनशीलता धोरणाची कठोर अंमलबजावणी करावी तसेच देशभर लागू होईल, असा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा तातडीने करावा, अशी मागणी आयएमएने केली असल्याचे डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी सांगितले. हल्लेखोरांवर कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिव डॉ. विश्रांत भारती यांनी केली.

लातूर जिल्ह्यातील (Latur Health Services) सर्व डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे तसेच नागरिकांनी या आंदोलनाला सहकार्य करावे आणि अत्यावश्यक नसलेल्या उपचारांसाठी २० जुलै रोजी रुग्णालयात येणे टाळावे, असे आवाहन लातूर आयएमएने केले आहे.आयएमएच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास १ ऑगस्टपासून राज्यभर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आयएमए महाराष्ट्रने दिला आहे.

संबंधित सामग्री

इंडियन मेडिकल असोसिएशनचा परवाना नसलेल्या लॅब जवळा बाजारात सुरू

इंडियन मेडिकल असोसिएशनचा परवाना नसलेल्या लॅब जवळा बाजारात सुरू

Indian Medical Association: रक्त तपासणी करणार्‍या आठ मेडिकल लॅब कार्यरत असून बहुतेक जणांकडे इंडियन मेडिकल असोसिएशनचा मान्यताप्राप्त परवाना नसताना रक्त तपासणीचा गोरख धंदा सुरू

Aug 12, 2026
'विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधी यांचे अमित शाहांना थेट पत्र

'विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधी यांचे अमित शाहांना थेट पत्र

Rahul Gandhi Investigation: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून, 20 जुलै रोजी दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाई

Jul 26, 2026
दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज विरोधात यवतमाळ वकील संघातर्फे निषेध 

दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज विरोधात यवतमाळ वकील संघातर्फे निषेध 

Yavatmal Bar Association Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासाठी यवतमाळ वकील संघाच्या वतीने शुक्रवार २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेद

Jul 24, 2026
जंतर-मंतर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ परभणी बंद; व्यापारी, सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जंतर-मंतर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ परभणी बंद; व्यापारी, सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Parbhani Bandh: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी पुकारलेल्या परभणी बंदला व्यापारी, दुकानदार, विविध सामाजिक संघटना...

Jul 23, 2026