वीज ग्राहक मोर्चा 

वीज ग्राहकांच्या प्रलंबित समस्यां बाबत 11 ऑगस्टला धडक मोर्चा 

Electricity Consumers Protest: वीज ग्राहकांच्या प्रलंबित समस्यां बाबत 11 ऑगस्ट रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे वीज ग्राहक संघटनेचे अधिक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.

वीज ग्राहकांच्या प्रलंबित समस्यां बाबत 11 ऑगस्टला धडक मोर्चा 

Electricity Consumers Protest

 

वीज ग्राहक संघटनेचे अधिक्षक अभियंता यांना निवेदन 

हिंगोली (Electricity Consumers Protest) : वीज ग्राहकांच्या प्रलंबित समस्यां बाबत 11 ऑगस्ट रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे वीज ग्राहक संघटनेचे अधिक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ग्राहकांच्या विनापरवानगी बसल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटर, वीज ग्राहकांच्या सतत भेडसावणाऱ्या विविध गंभीर समस्या आणि अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्राहक संघटनेच्या वतीने ११ ऑगस्टला महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा' चे आयोजन करण्यात आले आहे.

या (Electricity Consumers Protest) मोर्चाद्वारे वीज ग्राहकांच्या सर्व प्रमुख अडचणी आपल्यापर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. या अडचणींवर आपल्या विभागाकडून केवळ आश्वासने न मिळता, ठोस उत्तरे आणि समाधानकारक तोडगा निघणे अपेक्षित आहे. तसेच, या संदर्भात खालील बाबींकडे आपले गांभीर्याने लक्ष वेधत आहोत असे निवेदनात नमूद केले आहे यामध्ये मोर्चाच्या दिवशी वीज ग्राहकांच्या समस्यांवर प्रत्यक्ष, सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण स्वतः तसेच संबंधित विषयांचे सक्षम अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहावेत, ही नम्र पूर्वसूचना आपणास देण्यात येत आहे.

आपल्या स्थानिक, दुय्यम कार्यालयांमध्ये वीज ग्राहक जेव्हा आपल्या लेखी तक्रारी घेऊन जातात, तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांकडून तक्रारी स्वीकारल्या जात नाहीत किंवा तक्रारीची रीतसर पोच पावती  दिली जात नाही. ग्राहकांनी लेखी तक्रार दिल्यास ती स्वीकृत करून पोच देणे हे कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असतानाही, असे न करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे ग्राहकांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

 प्रमुख मागण्या मध्ये  11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या चर्चेसाठी सर्व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवण्यात यावे.सर्व स्थानिक कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांच्या लेखी तक्रारी स्वीकृत करून त्यांची रीतसर पोच पावती देण्याबाबत स्पष्ट व कडक लिखित सूचना त्वरित देण्यात याव्यात. ग्राहकांच्या प्रलंबित वीज समस्यांचे त्वरित निवारण करण्यात यावे.या निवेदनाची व त्यातील बाबींची अत्यंत गांभीर्याने नोंद घ्यावी आणि आवश्यक ती कार्यवाही करावी अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर नंदकिशोर तोष्णीवाल,पंकज अग्रवाल, अनिल नैनवाणी,  माबुद बागवान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वीज ग्राहक (Electricity Consumers Protest) बांधवांच्या ज्या तक्रारी होत्या एम एस सी बी  कडे तक्रार अर्ज दिल्यावर सदरील तक्रार अर्ज बाबत रिसीव्हड देण्यात येत नाही. याबाबत  वीज ग्राहक संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन सर्व वीज ग्राहक यांच्या अडीअडचणी बाबत जे तक्रार अर्ज आपल्याकडे प्राप्त होत आहे या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने त्यांना रिसिव्हड देण्यात यावी. 11 ऑगस्ट   च्या मोर्चा बाबत निवेदन स्वीकारण्या साठी सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहावे बाबत कल्पना देण्यात आली.

संबंधित सामग्री

ताकतोडा येथे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, बोगस खतांवर कारवाईची मागणी

ताकतोडा येथे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, बोगस खतांवर कारवाईची मागणी

Farmer Jal Samadhi Andolan: सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे शेतकऱ्यांनी विहिरीत उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन

Aug 19, 2026
शेतकऱ्यांचा आष्टीत चक्काजाम, तीनही प्रमुख मार्ग ठप्प

शेतकऱ्यांचा आष्टीत चक्काजाम, तीनही प्रमुख मार्ग ठप्प

Ashti Farmer Chakkajam: वरद फेरोज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केल्याच्या घटनेनंतर परिसरातील शेतकरी संतप्त..ड्रोन उडविणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रोखून जाब विचारला..

Aug 07, 2026
धरणग्रस्तांचा लढा तीव्र; २० ऑगस्टला पुन्हा बैठक, प्रशासनाला दिले निवेदन 

धरणग्रस्तांचा लढा तीव्र; २० ऑगस्टला पुन्हा बैठक, प्रशासनाला दिले निवेदन 

Hingoli Dam-Affected People: धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाला आता उत्तर द्यावेच लागेल, अशी ठाम भूमिका धरणग्रस्त संघर्ष समितीने घेतली आहे.

Aug 05, 2026
विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज होण्याची भीती? बंगालमधून 2,000 CRPF कमांडो आणि 30 कंपन्या तैनात

विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज होण्याची भीती? बंगालमधून 2,000 CRPF कमांडो आणि 30 कंपन्या तैनात

CJP Jantar Mantar Protest: CRPF च्या 20 अतिरिक्त कंपन्या पश्चिम बंगालमधून दिल्लीत विमानाने आणण्यात आल्या आहेत. अलीकडील हिंसक चकमकी आणि कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान लक्षात घेऊन हा निर्णय

Jul 22, 2026