आष्टी शेतकरी चक्काजाम

शेतकऱ्यांचा आष्टीत चक्काजाम, तीनही प्रमुख मार्ग ठप्प

Ashti Farmer Chakkajam: वरद फेरोज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केल्याच्या घटनेनंतर परिसरातील शेतकरी संतप्त..ड्रोन उडविणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रोखून जाब विचारला..

शेतकऱ्यांचा आष्टीत चक्काजाम, तीनही प्रमुख मार्ग ठप्प

Ashti Farmer Chakkajam

आष्टी/ गडचिरोली (Ashti Farmer Chakkajam) : मुधोली चक नं. 2 येथे 9 जुलै रोजी वरद फेरोज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केल्याच्या घटनेनंतर परिसरातील शेतकरी संतप्त झाले होते. ड्रोन उडविणाऱ्या कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखून जाब विचारला होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत संबंधित तिघांची सुटका केली. या प्रकरणी कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, याच घटनेप्रकरणी पोलिसांनी सात शेतकऱ्यांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी (Ashti Farmer Chakkajam) आष्टी पोलीस ठाण्यावर धडकले. मात्र, पोलीस प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने संतप्त शेतकरी थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचले.

तेथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या देत चक्काजाम आंदोलन सुरू केले. यामुळे चंद्रपूर–चामोर्शी–अहेरी या तीनही प्रमुख मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळ संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याने लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता. वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत होते. (Ashti Farmer Chakkajam) शेतकऱ्यांनी मात्र, सातही शेतकऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई थांबवावी, अशी ठाम भूमिका घेत आंदोलन सुरूच ठेवले.