हिंगोली (Petrol Diesel Crisis) : आखातील देशातील युध्दामुळे इंधनावर त्याचा चांगलाच परिणाम जाणवत आहे. त्यातच दोन दिवसाच्या सुट्ट्या आल्याने बुधवारी काही पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या पेट्रोलसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर काही पेट्रोल पंपावर साठाच नसल्याने पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला होता. आखाती देशामध्ये युध्द सुरू असल्याने त्याचा परिणाम जाणवत आहे. हिंगोली जिल्ह्यात जवळपास ६२ पेट्रोल पंप आहेत. या (Petrol Diesel Crisis) पेट्रोल पंपावर प्रत्येक दिवशी दिड ते दोन लाख लिटर पेट्रोल उपलब्ध होत असते. तसेच ४ ते ५ लाख लिटर डिझेल उपलब्ध होते. जिल्ह्यामध्ये हजारो वाहनधारक असल्याने त्यांना तात्काळ डिझेल, पेट्रोल उपलब्ध व्हावे, या करीता प्रयत्न केले जात आहेत.
हिंगोली शहर व परिसरात जवळपास १४ पेट्रोल पंप आहेत. आतापर्यंत कोणत्याही (Petrol Diesel Crisis) पेट्रोल पंपावर डिझेल, पेट्रोलचा तुटवडा जाणवला नाही. २४ मार्च रोजी रात्रीपासुन काही पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा जाणवला. २५ मार्च बुधवार रोजी काही पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध असल्याने अनेक वाहन चालकांनी पेट्रोल घेण्याकरीता गर्दी केली होती. याच गर्दीला पाहून रस्त्यावरून येणार्या जाणार्या वाहन चालकांनी देखील पेट्रोलच्या तुटवड्याची भिती व्यक्त करून वाहनात पेट्रोल भरण्यासाठी अधिकच गर्दी केली होती.
विशेष म्हणजे पेट्रोल पंप (Petrol Diesel Crisis) धारकांना डिझेल, पेट्रोलसाठी अग्रीम रक्कम भरल्यानंतरच डिझेल, पेट्रोल डेपोवरून उपलब्ध करून दिले जात आहे. हिंगोली जिल्ह्याला गायगाव जि. अकोला व मनमाड जि. नाशिक या डेपोवरून डिझेल, पेट्रोल पुरविले जाते. दुपारी ३ वाजता डेपो बंद केला जात असल्याने पेट्रोल पंप धारकांची चांगलीच फजीती होत आहे. त्यातच शनिवार व रविवार हा सुट्टीचा दिवस आल्याने वाहनधारकांना डिझेल, पेट्रोल उपलब्ध करून देत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली.
हिंगोलीत काही पेट्रोल पंपावर वाहन धारकांची गर्दी तर काहींचा संपला साठा
Petrol Diesel Crisis: हिंगोलीतील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोलसाठी मोठ्या रांगा लागल्या; आखातील युध्दामुळे इंधनाचा तुटवडा जाणवत आहे.
Petrol Diesel Crisis
संबंधित सामग्री
जळीत कांडावरून पुढार्यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर
Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..
पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Petrol pump murder case: वसमत तालुक्यातील चोंडी स्टेशन येथील साई उमेश पेट्रोलपंपावर पेट्रोलपंप चालविण्यावरून झालेल्या वादाचा रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली.
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय
Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.