हिंगोली पोलिस गुन्हा

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

Hingoli Police Crime Case: तू आमच्या विरोधात उपोषण का करतो या कारणावरून शिवीगाळ करून थापडा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

Hingoli Police Crime Case

 

हिंगोली शहर पोलिसात चौघांविरुद्ध आदखलपात्र गुन्हा दाखल

हिंगोली (Hingoli Police Crime Case) : "तू आमच्या विरोधात उपोषण का करतो" या कारणावरून शिवीगाळ करून थापडा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली समोर  ही घटना घडली.

यातील फिर्यादी गजानन बाबाराव शिंदे, रा. केसापूर ता.जि. हिंगोली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रमेश विठ्ठल शिंदे, राजेश रामेश्वर शिंदे, सुरेश हनुमान शिंदे, विलास हनुमान शिंदे, सर्व रा. केसापूर ता.जि. हिंगोली यांनी संगनमत करून अर्जदाराला "तू आमच्या विरोधात उपोषण का करतो" या कारणावरून शिवीगाळ करून थापडा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या (Hingoli Police Crime Case) प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात हा अदखलपात्र गुन्हा रात्री दाखल करण्यात आला  आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गणाजी पोटे हे करीत आहेत.