हिंगोली दसरा महोत्सव

हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सव; प्रदर्शनीतील झुले व दुकानांचा लिलाव बारगळला

Hingoli Dussehra Festival: प्रसिध्द असलेल्या श्री सार्वजनिक दसरा महोत्सवाची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली. २८ सप्टेंबरला प्रदर्शनीतील झुले व दुकानांच्या लिलावाची प्रक्रीया घेण्यात आली.

हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सव; प्रदर्शनीतील झुले व दुकानांचा लिलाव बारगळला

Hingoli Dussehra Festival

 

लिलाव प्रक्रीयेला व्यापार्‍यांकडून मिळाला नाही प्रतिसाद

हिंगोली (Hingoli Dussehra Festival) : येथील प्रसिध्द असलेल्या श्री सार्वजनिक दसरा महोत्सवाची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली. २८ सप्टेंबरला प्रदर्शनीतील झुले व दुकानांच्या लिलावाची प्रक्रीया घेण्यात आली. यामध्ये व्यापार्‍यांनी प्रतिसाद दिला नसल्याने झुले व दुकानांचा लिलाव बारगळला. आता लवकरच यावर प्रशासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे. 

सार्वजनिक दसरा महोत्सव (Hingoli Dussehra Festival) समितीच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात सार्वजनिक दसरा महोत्सव अंतर्गत घेण्यात येणार्‍या विविध लिलाव प्रक्रिया च्या अनुषंगाने  तथा दसरा समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या दालनात लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली.  यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीधर घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी दसरा महोत्सव समितीच्या वतीने भरविण्यात येणार्‍या प्रदर्शनीतील २२० दुकाने व झुल्यांकरीता लिलावाची प्रक्रीया पार पाडली जात होती. गतवर्षी झुल्याच्या लिलावात १ कोटी ५ लाख रुपयाचे उत्पन्न झाले होते. तर प्रदर्शनीतील दुकानांच्या माध्यमातून ५५ लाख रुपये उत्पन्न झाले होते. त्यानुसार यावर्षी भरविण्यात येणार्‍या प्रदर्शनीत झुल्यांसाठी ८५ लाखांची तर २२० दुकानांकरीता ३० लाख रुपयाची शासकीय बोली ठेवली होती. 

यावेळी बोटावर मोजण्या इतके व्यापारी या लिलाव प्रक्रीयेत सहभागी झाले होते. त्यांनी शासकीय बोली मान्य केली नसल्याने पहिली लिलावाची प्रक्रीया बारगळली. त्यामुळे प्रशासनाकडून यावर लवकरच विचार केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जय्यत तयारी, १७२ वर्षांची परंपरा

हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जय्यत तयारी, १७२ वर्षांची परंपरा

Hingoli Dussehra Festival: थील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनाची पूर्वतयारी जोमात सुरू झाली असून यावर्षी ऐतिहासिक दसरा महोत्सव १७२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांसापूजन

Oct 04, 2026
हिंगोलीच्या दसर्‍याची प्रशासनाने पुर्वी सारखी स्विकारली जबाबदारी

हिंगोलीच्या दसर्‍याची प्रशासनाने पुर्वी सारखी स्विकारली जबाबदारी

Hingoli Dussehra Festival: जिल्हा प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक दसरा महोत्सव समिती अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यंदाही परंपरागत सार्वजनिक दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती

Sep 22, 2026
हिंगोलीचा दसरा प्रशासनामार्फत साजरा करण्यासाठी महसुल मंत्र्यांना आ. तान्हाजी मुटकुळेंनी दिले पत्र

हिंगोलीचा दसरा प्रशासनामार्फत साजरा करण्यासाठी महसुल मंत्र्यांना आ. तान्हाजी मुटकुळेंनी दिले पत्र

Hingoli Dussehra Festival: ऐतिहासिक दसरा महोत्सव २०१६ हा प्रशासनामार्फत साजरा करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याकरीता आ. तान्हाजी मुटकुळे यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्र पाठविले

Sep 16, 2026
हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव प्रशासनानेच साजरा करावा

हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव प्रशासनानेच साजरा करावा

Hingoli Dussehra Festival: देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व प्रसिद्ध मानला जाणारा हिंगोलीचा ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ प्रशासनामार्फतच साजरा करावा

Aug 31, 2026
हिंगोलीचा सार्वजनिक दसरा महोत्सव निवडणूक व एसआयआर कामांमुळे साजरा करणे शक्य नाही 

हिंगोलीचा सार्वजनिक दसरा महोत्सव निवडणूक व एसआयआर कामांमुळे साजरा करणे शक्य नाही 

Hingoli Dussehra Festival: ग्रामपंचायत निवडणूक व संभाव्य जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल यंत्रणेवर मोठा ताण येणार असून यामुळे हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव साजरा

Aug 03, 2026