हिंगोली दसरा महोत्सव

हिंगोलीच्या दसर्‍याची प्रशासनाने पुर्वी सारखी स्विकारली जबाबदारी

Hingoli Dussehra Festival: जिल्हा प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक दसरा महोत्सव समिती अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यंदाही परंपरागत सार्वजनिक दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती

हिंगोलीच्या दसर्‍याची प्रशासनाने पुर्वी सारखी स्विकारली जबाबदारी

Hingoli Dussehra Festival

 

उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

हिंगोली (Hingoli Dussehra Festival) : जिल्हा प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक दसरा महोत्सव समिती अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यंदाही परंपरागत सार्वजनिक दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष समाधान घुटुकडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.

हिंगोलीतील प्रसिध्द असलेल्या श्री सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनाबाबत प्रारंभी प्रशासनाने भविष्यातील निवडणूकीच्या कामामुळे स्विकारण्यास नकार दिला होता. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना तसे पत्रही दिले होते. त्यानंतर तहसील प्रशासनाने हिंगोली नगर परिषदेने दसरा महोत्सवाची जबाबदारी स्विकारावी याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर मुख्याधिकारी प्रांजली मुंढे यांनीही दसरा महोत्सवा संदर्भात नकार घंटा दर्शविली होती. त्यामुळे सार्वजनिक दसरा महोत्सवाबाबत मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता.

परंतु या संदर्भात उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे व तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी संयुक्त चर्चा केल्यानंतर पुर्वी सारखाच (Hingoli Dussehra Festival) दसरा भरविण्याबाबत एकमत केले. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी या संदर्भात पत्रकार परिषद बोलाविली होती. ज्यामध्ये उपविभागीय अधिकार्‍यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून एसआयआर व इतर कामांच्या व्यापामुळे वेळ कमी मिळाला असला तरी नागरिकांचा हिरमोड होऊ नये यासाठी प्रशासनाने दसरा महोत्सवाचे नियोजन केले आहे. याबाबत तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्याशी चर्चा झाली असून महोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाचा दसरा महोत्सव पुढील महिन्यात १० ते २५ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून २५ सप्टेंबरला बासापूजनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. वेळेअभावी यंदा ई-टेंडर प्रक्रिया राबवली जाणार नाही.

दरवर्षी १ जुलैचा लिलाव आणि गाळ्यांचा लिलाव स्वतंत्रपणे काढला जातो, मात्र मनुष्यबळाअभावी यंदा दोन्ही लिलाव एकत्रित करून ठोक पद्धतीने एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहेत. हा महोत्सवाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याने सोमवार २८ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात खुल्या बोली पद्धतीने थेट लिलाव आयोजित करण्यात आला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया व्हिडीओ चित्रीकरणासह पारदर्शकपणे पार पडणार असून त्याबाबतची प्रसिद्धी वृत्तपत्रातून दिली जाणार आहे. लिलावाच्या अटी व शर्ती दसरा समिती कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध असतील. इतर कामांसाठी ऑफलाईन कोटेशन मागवण्यात येणार आहेत.

दरम्यान यंदाच्या (Hingoli Dussehra Festival) दसरा महोत्सवात विशेष आकर्षण म्हणून ड्रोन शो चे आयोजन करण्याचा प्रशासनाचा मानस असून तांत्रिक बाबी जुळून आल्यास नागरिकांना पहिल्यांदाच दसरा महोत्सवात ड्रोन शो पाहण्याची संधी मिळणार असल्याचे घुटूकडे यांनी बोलताना सांगितले.

संबंधित सामग्री

हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जय्यत तयारी, १७२ वर्षांची परंपरा

हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जय्यत तयारी, १७२ वर्षांची परंपरा

Hingoli Dussehra Festival: थील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनाची पूर्वतयारी जोमात सुरू झाली असून यावर्षी ऐतिहासिक दसरा महोत्सव १७२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांसापूजन

Oct 04, 2026
हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सव; प्रदर्शनीतील झुले व दुकानांचा लिलाव बारगळला

हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सव; प्रदर्शनीतील झुले व दुकानांचा लिलाव बारगळला

Hingoli Dussehra Festival: प्रसिध्द असलेल्या श्री सार्वजनिक दसरा महोत्सवाची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली. २८ सप्टेंबरला प्रदर्शनीतील झुले व दुकानांच्या लिलावाची प्रक्रीया घेण्यात आली.

Sep 28, 2026
हिंगोलीचा दसरा प्रशासनामार्फत साजरा करण्यासाठी महसुल मंत्र्यांना आ. तान्हाजी मुटकुळेंनी दिले पत्र

हिंगोलीचा दसरा प्रशासनामार्फत साजरा करण्यासाठी महसुल मंत्र्यांना आ. तान्हाजी मुटकुळेंनी दिले पत्र

Hingoli Dussehra Festival: ऐतिहासिक दसरा महोत्सव २०१६ हा प्रशासनामार्फत साजरा करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याकरीता आ. तान्हाजी मुटकुळे यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्र पाठविले

Sep 16, 2026
हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव प्रशासनानेच साजरा करावा

हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव प्रशासनानेच साजरा करावा

Hingoli Dussehra Festival: देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व प्रसिद्ध मानला जाणारा हिंगोलीचा ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ प्रशासनामार्फतच साजरा करावा

Aug 31, 2026
हिंगोलीचा सार्वजनिक दसरा महोत्सव निवडणूक व एसआयआर कामांमुळे साजरा करणे शक्य नाही 

हिंगोलीचा सार्वजनिक दसरा महोत्सव निवडणूक व एसआयआर कामांमुळे साजरा करणे शक्य नाही 

Hingoli Dussehra Festival: ग्रामपंचायत निवडणूक व संभाव्य जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल यंत्रणेवर मोठा ताण येणार असून यामुळे हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव साजरा

Aug 03, 2026