हिंगोली (Hingoli Dussehra Festival) : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव २०१६ हा प्रशासनामार्फत साजरा करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याकरीता आ. तान्हाजी मुटकुळे यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्र पाठविले असुन याबाबत जिल्हाधिकार्यांनी वस्तुती दर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना ना. बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
येथील सार्वजनिक दसरा महोत्सव (Hingoli Dussehra Festival) हा प्रसिध्द आहे. यावर्षी विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम, ग्रा.प. व संभाव्य जि.प., प.स. निवडणुकीमुळे महसुल यंत्रणेवर ताण असल्याचे कारण देत उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी उत्सव साजरा करणे अशक्य असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले आहे. दरवर्षी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून हिंगोलीचे नागरीक महोत्सवाच्या नियोजनात सक्रीय सहभागी होतात. त्यामुळे या (Hingoli Dussehra Festival) ऐतिहासिक दसर्याचे नियंत्रण व नियोजन प्रशासनाने स्वत:कडेच ठेवावे या संदर्भात आ. तान्हाजी मुटकुळे यांनी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिले आहे.
हिंगोलीचा दसरा प्रशासनामार्फत साजरा करण्यासाठी महसुल मंत्र्यांना आ. तान्हाजी मुटकुळेंनी दिले पत्र
Hingoli Dussehra Festival: ऐतिहासिक दसरा महोत्सव २०१६ हा प्रशासनामार्फत साजरा करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याकरीता आ. तान्हाजी मुटकुळे यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्र पाठविले
Hingoli Dussehra Festival
संबंधित सामग्री
हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जय्यत तयारी, १७२ वर्षांची परंपरा
Hingoli Dussehra Festival: थील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनाची पूर्वतयारी जोमात सुरू झाली असून यावर्षी ऐतिहासिक दसरा महोत्सव १७२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांसापूजन
हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सव; प्रदर्शनीतील झुले व दुकानांचा लिलाव बारगळला
Hingoli Dussehra Festival: प्रसिध्द असलेल्या श्री सार्वजनिक दसरा महोत्सवाची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली. २८ सप्टेंबरला प्रदर्शनीतील झुले व दुकानांच्या लिलावाची प्रक्रीया घेण्यात आली.
हिंगोलीच्या दसर्याची प्रशासनाने पुर्वी सारखी स्विकारली जबाबदारी
Hingoli Dussehra Festival: जिल्हा प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक दसरा महोत्सव समिती अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यंदाही परंपरागत सार्वजनिक दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती
हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव प्रशासनानेच साजरा करावा
Hingoli Dussehra Festival: देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व प्रसिद्ध मानला जाणारा हिंगोलीचा ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ प्रशासनामार्फतच साजरा करावा
हिंगोलीचा सार्वजनिक दसरा महोत्सव निवडणूक व एसआयआर कामांमुळे साजरा करणे शक्य नाही
Hingoli Dussehra Festival: ग्रामपंचायत निवडणूक व संभाव्य जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल यंत्रणेवर मोठा ताण येणार असून यामुळे हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव साजरा