हिंगोली सायकल रॅली

हिंगोलीकरांच्या उत्स्फूर्त सहभागाने सायकल रॅलीने वेधले लक्ष; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

Hingoli Cycle Rally: हिंगोलीतील सायकल रॅलीत जागतिक पर्यावरण आणि सायकल दिनाचे आयोजन करण्यात आले. हिंगोलीच्या सायकल असोसिएशन, सद्भाव ह्यूमन डेव्हलपमेंट फाउंडेशन

हिंगोलीकरांच्या उत्स्फूर्त सहभागाने सायकल रॅलीने वेधले लक्ष; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

Hingoli Cycle Rally

हिंगोली (Hingoli Cycle Rally) : जागतिक सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सद्भाव ह्यूमन डेव्हलपमेंट फाउंडेशन, जिल्हा सायकल असोसिएशन आणि आशा सायकल यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली शहरात रविवारी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. 'सायकल चालवा, भविष्य घडवा' आणि 'आपली हिंगोली, ग्रीन हिंगोली, हेल्दी हिंगोली' अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. 

रॅलीची (Hingoli Cycle Rally) सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर पोस्ट ऑफिस रोड, जवाहर रोड, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इंदिरा गांधी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे एन.टी.सी. परिसरात या रॅलीचा उत्साहात समारोप झाला. मुख्य मार्गांवरून जाताना सायकल स्वारांनी पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा, झाडे लावा, जगवा अशा घोषणा देत जनजागृती केली. 

या (Hingoli Cycle Rally) उपक्रमात शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक-युवती आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. डॉ. यशवंत पवार, डॉ. राम मुंडे, डॉ. अभयकुमार भरतीया, डॉ. संजय नाकाडे, डॉ. अमित शाह, डॉ. झडपे, डॉ. प्रेमेंद्र बोथरा यांच्यासह संजय घन, गणेश पाटील, विजय ठाकरे, सारिका कयाल, ज्योती वाघमारे यांसारखे अनेक मान्यवर सायकलसह रॅलीत सहभागी झाले होते. सहभागींना टी शर्ट, टोपी, प्रमाणपत्र आणि नाश्ता देण्यात आला. लॉटरी पद्धतीने बक्षिसांचे वाटपही करण्यात आले. 

वाहनांच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषण वाढत असताना आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी सायकल हा उत्तम पर्याय आहे, हा संदेश रॅलीतून देण्यात आला. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर वाढवावा, देशी झाडे लावावीत, पावसाचे पाणी संकलित करावे, सिंगल यूज प्लास्टिक बंद करावे आणि कचरा न जाळता घंटागाडीत टाकावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पर्यावरण प्रेमींच्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

कळमनुरीत 13 ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रा; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

कळमनुरीत 13 ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रा; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

Kalamnuri Tiranga Yatra: कळमनुरी विधानसभा मतदारसंघात 13 ऑगस्टला 'भव्य तिरंगा' नामक राष्ट्रीय एकता व राष्ट्रियता जळाव्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Aug 12, 2026
सुधाकररावजी नाईक जलसंधारण अभियानद्वारे विविध कार्यक्रम व उपक्रम राज्यभरात राबवावे! 

सुधाकररावजी नाईक जलसंधारण अभियानद्वारे विविध कार्यक्रम व उपक्रम राज्यभरात राबवावे! 

Water Conservation Campaign: महाराष्ट्र शासनाने नुकताच माजी मुख्यमंत्री तथा 'जलसंधारणाचे प्रणेते' सुधाकररावजी नाईक साहेब यांचा २१ ऑगस्ट हा जयंतीदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय

Aug 04, 2026
हिंगोली सायकलिंग असोसिएशनचा पुढाकार; हिंगोलीतून 12 सायकलस्वार पंढरपूरकडे रवाना 

हिंगोली सायकलिंग असोसिएशनचा पुढाकार; हिंगोलीतून 12 सायकलस्वार पंढरपूरकडे रवाना 

Hingoli Cycling Association: हिंगोली येथून पंढरपूर रिंगण सोहळ्यासाठी गेलेले १२ सायकलस्वारी १२ जुलैला एकत्रित सहभागी होणार असून पर्यावरण आणि आरोग्याच्या जगृतीचीही यात समाविष्ट आहे.

Jul 09, 2026
कन्हान येथे रिपब्लिकन सांस्कृतिक संघातर्फे बोधीवृक्षांचे वाटप

कन्हान येथे रिपब्लिकन सांस्कृतिक संघातर्फे बोधीवृक्षांचे वाटप

Republican cultural Sangh: डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकवर आयोजित कार्यक्रमात बोधीवृक्षांचे वाटप करण्यात आले. चंद्रशेखर भिमटे, केसीएस लामा यांच्या हस्तांतरणानंतर नागरिकांनी जास्त संख्येत भाग

Jul 06, 2026
पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणाचा उपक्रम

पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणाचा उपक्रम

Environmental Conservation: कन्हान नगरपालिकेच्या संस्थेशी पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑर्गनायझेशनने सहकार्य करून झाडे लावण्याचा महत्त्वाचा क्रम राबवला गेला. लोकसंख्या, युवा आणि महिलांचा मोठा उपस्थिती

Jul 05, 2026