हिंगोली सायकलिंग असोसिएशन

हिंगोली सायकलिंग असोसिएशनचा पुढाकार; हिंगोलीतून 12 सायकलस्वार पंढरपूरकडे रवाना 

Hingoli Cycling Association: हिंगोली येथून पंढरपूर रिंगण सोहळ्यासाठी गेलेले १२ सायकलस्वारी १२ जुलैला एकत्रित सहभागी होणार असून पर्यावरण आणि आरोग्याच्या जगृतीचीही यात समाविष्ट आहे.

हिंगोली सायकलिंग असोसिएशनचा पुढाकार; हिंगोलीतून 12 सायकलस्वार पंढरपूरकडे रवाना 

Hingoli Cycling Association

हिंगोली (Hingoli Cycling Association) : हिंगोली असोसिएशनच्या पुढाकारातून पंढरपूर रिंगण सोहळ्यासाठी हिंगोली येथून  12 सायकल स्वार पंढरपूरकडे गुरुवारी रवाना झाले. राज्यातून जवळपास चार हजार सायकल स्वार पंढरपूरात 12 जुलै रोजी एकत्र जमून रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यानुसार बुधवारी अमरावती येथील 45 सायकल स्वार हिंगोली मार्गे पंढरपूरकडे रवाना झाले. त्यानुसार गुरुवारी हिंगोली येथील सायकल स्वार सकाळी सहा वाजता श्रीनगर येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात आरती करून पंढरपूर कडे रवाना झाले.

यामध्ये चार सायकल पट्टू हे साठ वर्षावरील आहेत. नऊ ते 12 जुलै पर्यंत हा प्रवास आहे. 12 जुलै रोजी पंढरपूर येथे रिंगण सोहळा रंगणार आहे. यामध्ये सायकलिंग असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष प्रवीण काळबांडे, रमेश सानप, डॉ. गजानन शिंदे, शिवचरण ठाकूर, राजेश पांडे, गजानन घुगे, विठ्ठल जाधव, मारुती बोबडे, विवेक वाकडे, अविनाश बोथीकर, श्रीरंग कऱ्हाळे आदींचा समावेश आहे.

प्रवासा दरम्यान पर्यवारण, आरोग्य याची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच बॉल सीड सोबत घेऊन वृक्षारोपण करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रवासा दरम्यान ठीक ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे.

संबंधित सामग्री

 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.

Oct 02, 2026
चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीत जयस्तंभ चौक ते खामगाव चौफुली मार्गावर सुरू असलेल्या वृक्षलागवडीची नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पाहणी करून वृक्षसंवर्धनाच्या सूचना दिल्या.

Sep 17, 2026
आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन

आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन

MLA Santosh Bangar: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निघणाऱ्या भव्य कावड यात्रेत यंदाही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे विलोभनीय दर्शन घडले.

Aug 25, 2026
पिंपळदरी-फुलदाभा मार्गावरील वृक्ष लागवडीचा लाखो रुपयांचा निधी वाया; दुसऱ्याच दिवशी झाडे भुईसपाट

पिंपळदरी-फुलदाभा मार्गावरील वृक्ष लागवडीचा लाखो रुपयांचा निधी वाया; दुसऱ्याच दिवशी झाडे भुईसपाट

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी ते फुलदाभा या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा दोन दिवसांपूर्वी मोठ्या थाटात वृक्ष लागवड करण्यात आली होती.

Aug 06, 2026
सुख, शांती व समाधानाचा संदेश; योगा ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

सुख, शांती व समाधानाचा संदेश; योगा ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Yoga Group Gurupurnima: योग शिक्षकांनी गुरुपौर्णिमावरील उत्साहात वृक्षारोपणाद्वारे पर्यावरण संवर्धनाचे संदेश दाखवले. सामाजिक आणि पर्यावरणीय जागरूकता वाढावयाची ही एक पद्धत.

Jul 29, 2026