कळमनुरी (Kalamnuri Tiranga Yatra) : देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याबद्दलचा आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने कळमनुरी विधानसभा मतदारसंघात गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही यात्रा मोठा मारोती मंदिरापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगरपरिषद कळमनुरी येथे समारोप होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि समस्त देशभक्त नागरिकांच्या पुढाकाराने होत असलेल्या या यात्रेत कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, युवक युवती तसेच माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार तिरंग्याच्या सन्मानार्थ सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रभक्तीचा संदेश घराघरात पोहोचवणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरम् च्या घोषणांनी परिसर दुमदुमेल. या भव्य तिरंगा यात्रेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन समस्त देशभक्त कळमनुरी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.