Hingoli Accident

नरवाडी शिवारात भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्ग (NH-161) वरील नरवाडी फाट्याजवळ शुक्रवारी (१९ जून) सायंकाळी भीषण अपघात झाला.

नरवाडी शिवारात भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

Hingoli Accident

NH-161 हिंगोली-नांदेड महामार्गावरील नरवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाची धडक

आखाडा बाळापूर (Hingoli Accident) : हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्ग (NH-161) वरील नरवाडी फाट्याजवळ शुक्रवारी (१९ जून) सायंकाळी भीषण अपघात झाला. कळमनुरीहून येलकीकडे दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन लक्ष्मणराव पतंगे (वय ५०) आणि पंजाबराव माधवराव पतंगे (वय ६५), दोघेही रा. येलकी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली हे MH-38 AF-7730 क्रमांकाच्या दुचाकीवरून कळमनुरीहून येलकीकडे जात होते. नरवाडी फाट्याजवळ पोहोचताच अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकी रस्त्यावर कोसळली. अपघातात चालक गजानन पतंगे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पंजाबराव पतंगे यांच्या डोक्याला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेषराव पोले, सय्यद तयब अली, वाघमारे आणि गजानन आगलावे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जखमी पंजाबराव पतंगे यांना NHAI जारोडा टोल येथील रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ आखाडा बाळापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी रस्त्याच्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी आखाडा बाळापूर बिटचे प्रमुख राजेश घोंगडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
पीडित कुटुंबाला जिल्हाधिकाऱ्यांचा धीर

पीडित कुटुंबाला जिल्हाधिकाऱ्यांचा धीर

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आखाडा बाळापूर येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातील मयत पंजाबराव मोरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदत व सुरक्षेबाबत विचारपूस केली.

Sep 26, 2026