उष्माघात प्रतिबंधक वैद्यकीय उपायांची सुविधा सज्ज ठेवा

उष्माघात प्रतिबंधक वैद्यकीय उपायांची सुविधा सज्ज ठेवा

Heatwave Prevention

आयुक्त डॉ. इटनकर यांच्या सूचना

नागपूर (Heatwave Prevention) : महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकारी समितीची बैठक मंगळवारी आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली.

बैठकीत आयुक्त डॉ. इटनकर यांनी शहरामध्ये उष्माघात प्रतिबंधासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची ठिकाणे उपलब्ध करणे तसेच आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.

याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., उपायुक्त मंगेश राजेश भगत, खवले, उपायुक्त महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत आयुक्तांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी ग्रीन नेट (सावलीसाठी जाळी) लावण्यात यावे व नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी स्मार्ट टॉयलेटच्या शेजारी तात्पुरत्या वॉटर किऑस्कची व्यवस्था करण्याचे सूचवले व रुग्णांना उष्णतेपासून बचाव मिळावा यासाठी शासकीय व महानगपालिका रुग्णालयांमध्ये कोल्ड वॉर्ड तयार करण्याबाबतही निर्देश देण्यात आले. तसेच उष्माघाताशी संबंधित पोस्टमार्टम अहवालथेट पोलिसांसोबत महापालिकेला पाठवावे या बद्दल निर्देशित केले.

कोल्ड शेड उभारा

अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी उष्माघातापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी 'कोल्ड शेड' उभारावेत, जेणेकरून नागरिकांना उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळेल अशा सूचना केल्या, याशिवाय क्रीडा विभाग, घनकचरा विभाग, अभियंता विभाग व इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून, उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना २०२६ प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात आपले मत व सूचना मांडल्या.

 

संबंधित सामग्री

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

नळातून मीटरभराचा नाळू; कोरचीच्या ‘शुद्ध पाण्या’च्या दाव्याला धक्का!

कोरचीच्या वार्ड क्रमांक १६ मध्ये नगरपंचायतीच्या नळातून मीटरभराचा नाळू निघाल्याचा प्रकार समोर आला असून, पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sep 24, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अंबिका नगर येथे बाळ मित्र शिव सेवा मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्यानिमित्त महाआरती, नंदी बैल पूजा, गोपालकाला आणि बक्षीस वितरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sep 10, 2026
नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपूर शहरात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे.

Sep 03, 2026
जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; डॉक्टर, कर्मचारी व सफाई कामगारांना बांधल्या राख्या

जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; डॉक्टर, कर्मचारी व सफाई कामगारांना बांधल्या राख्या

Hingoli Hospital Raksha Bandhan: महिला पतंजली योग समिती व लोकसेवा मंडळ रुग्ण मित्र यांच्या संयुक्त सहकार्याने शासकीय जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन

Aug 31, 2026