Gutkha Seized

हिंगोलीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याचा साठा जप्त; 4 लाख 71 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या साठवणूक करून चोरटी विक्री करणाऱ्यावर हिंगोली शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

हिंगोलीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याचा साठा जप्त; 4 लाख 71 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

हिंगोली : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या साठवणूक करून चोरटी विक्री करणाऱ्यावर हिंगोली शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 लाख 71 हजार 440 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला आहे.

याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अन्न व सुरक्षा मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक साहेबराव मस्के यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास बावनखोली परिसरात भारत गॅसच्या पाठीमागे असलेल्या एका टिनपत्र्याच्या घरामध्ये आरोपी शेख फरदीन शेख अजीम अहमद, रा. बावनखोली, ता. जि. हिंगोली याने सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास अपायकारक असलेला प्रतिबंधित गुटखा व पान मसाला विक्रीसाठी साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूचे पाउच आढळून आले. यामध्ये केसरयुक्त विमल पान मसाल्याचे पाउच, प्रिमीयम राजनिवास सुगंधित पान मसाला, आर. के. पान मसाला, के. एम. जाफरानी जर्दा आणि व्ही 01 तंबाखू यांचा समावेश आहे.

पोलिसांनी खाकी रंगाच्या 7 मोठ्या पोत्यांमध्ये असलेली पांढऱ्या रंगाची छोटी पोती जप्त केली असून, त्यामध्ये एकूण 4 लाख 71 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

छाप्यादरम्यान आरोपीने मुद्देमाल जागीच सोडून पोलिसांना पाहताच पळ काढला. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि आनंद बनसोडे हे करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंह ठाकुर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कुमार मस्के, पोलीस हवालदार सुनील अंभोरे, शेख मोहसीन, पोलीस शिपाई दिलीप लेकुळे, गणेश लेकुळे, बाबासाहेब कांबळे, आकाश भुतेकर, आकाश इंगोले आणि महिला पोलीस शिपाई विमल होगे यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.

Oct 07, 2026
पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने गौरव केला. विकास, कल्याण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक भूमिकेचा ठरावात उल्लेख.

Oct 07, 2026
तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

Viatina-19 Cow Record: ब्राझीलमध्ये झालेल्या एका विशेष लिलावात भारतीय वंशाच्या नेल्लोर (ओंगोल) प्रजातीतील ‘वियाटिना-19’ या गायीने तब्बल 40 कोटी रुपयांची विक्रमी बोली, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Oct 06, 2026
 सोनं-चांदीच्या दरातील घसरण थांबली; २४ कॅरेट सोनं १,४९,१८० रुपये, चांदी २३५ रुपये प्रति ग्रॅम

सोनं-चांदीच्या दरातील घसरण थांबली; २४ कॅरेट सोनं १,४९,१८० रुपये, चांदी २३५ रुपये प्रति ग्रॅम

सोनं-चांदीच्या दरातील घसरणीला आज ब्रेक लागला आहे. १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्यासह चांदीचे आजचे दर जाणून घ्या.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026