भेसळमुक्त व दर्जेदार अन्नपदार्थ विक्रीचा निर्धार

हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

भेसळमुक्त व दर्जेदार अन्नपदार्थ विक्रीचा निर्धार

Grocery Association

कळमनुरीतील किराणा व्यापाऱ्यांचा सुट्या खाद्यतेल विक्री बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

कळमनुरी (Grocery Association) : अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी शहरातील किराणा व्यापाऱ्यांच्या विविध समस्या, ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आणि व्यवसायातील गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने कळमनुरी किराणा असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीत किराणा व्यवसायाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले. ग्राहकांचा विश्वास कायम राखण्यासाठी आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने मंजूर करण्यात आले.

यावेळी प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या दुकानात स्वच्छता राखणे, भेसळमुक्त व दर्जेदार अन्नपदार्थांची विक्री करणे, मुदतबाह्य वस्तू विक्रीस न ठेवणे तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

सुट्या खाद्यतेल विक्रीला पूर्णविराम

बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शहरातील कोणत्याही किराणा दुकानात सुट्या स्वरूपात खाद्यतेलाची विक्री न करण्याचा ठराव. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने केवळ नामांकित कंपन्यांचे पॅकबंद खाद्यतेलच विक्रीस ठेवण्याचा निर्णय सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने मंजूर केला.

ग्राहकहिताला प्राधान्य देण्याचे आवाहन

यावेळी मार्गदर्शन करताना नंदकिशोर तोष्णीवाल यांनी ग्राहकांना सुरक्षित, शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे ही व्यापाऱ्यांची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करताना दुकानातील स्वच्छता, वस्तूंची गुणवत्ता आणि नियमांचे काटेकोर पालन यावर विशेष भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच मुदतबाह्य वस्तूंसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवावी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेकडे दडपण म्हणून न पाहता ग्राहकहिताच्या दृष्टीने सकारात्मकतेने पाहावे, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीस जावेद किराणा, आनंद प्रोव्हिजन, जिया बेग किराणा, जयश्री किराणा, नईम शिरमी, बेग किराणा, संजरी किराणा, महारुद्र ट्रेडिंग, केजीएन किराणा, मुखीद बेग, जाकीर किराणा, शिवराज ट्रेडर्स, कोहिनूर ट्रेडिंग कंपनी, स्वास्तिक प्रोव्हिजन, पारसनाथ किराणा, अनिल वीरचंद राके, स्वामी समर्थ किराणा, प्रकाश प्रोव्हिजन, श्रीकांत मांडवगडे, अंकित साकळे, न्यू केशर ट्रेडिंग यांच्यासह शहरातील अनेक किराणा व्यापारी उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी ग्राहकांना भेसळमुक्त, सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून कळमनुरीतील किराणा व्यवसाय अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

संबंधित सामग्री

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; संजय राऊतांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर.

Sep 29, 2026