चाकूर (Wagholi Burglary case) : तालुक्यातील वाघोली येथे अज्ञात चोरट्याने घराच्या पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील गंगाधर गहिणाजी केंद्रे (वय ७२) यांच्या राहत्या घरात ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेनंतर ते १ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजण्यापूर्वीच्या कालावधीत ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्याचे विविध दागिने, चांदीचे कडे आणि २५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याचे सेवन पीस, मण्यांच्या पोती, झुमके, कानातील दागिने, फुले, मणी, बाळ्या, काडी व पान तसेच पाच तोळे वजनाचे चांदीचे कडे यांचा समावेश आहे. दागिन्यांची अंदाजे किंमत १ लाख १७ हजार ४०० रुपये असून, रोख २५ हजार रुपये असा एकूण १ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
या (Wagholi Burglary case) प्रकरणी गंगाधर केंद्रे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३६/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मायने, पोलीस निरीक्षक भंडे आणि ग्रेड पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
वाघोलीत घरफोडी; रात्री घराचे कुलूप तोडून दागिने व रोकड लंपास
Wagholi Burglary case: वाघोली येथे अज्ञात चोरट्याने घराच्या पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४२ हजार ४०० रुपया..
Wagholi Burglary case
संबंधित सामग्री
पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला
Patur burglary case: शहरातील सैदू प्लॉट-मुजावरपुरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट व बेडरूमचे कुलूप तोडून रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना
परभणीत घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद; १० हजारांचा मोबाईल जप्त
घरफोडीच्या गुन्ह्यासह विविध प्रकरणांत पोलिसांना पाहिजे असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी साखला प्लॉट परिसरातून ताब्यात घेतले.
कांद्रीत घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह १.६० लाखांचा ऐवज लंपास
Kandri Burglary Case: पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड क्र. ५ कांद्री येथे अज्ञात चोरट्याने घराचे कूलुप तोडुन घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सोन्याचे दागिने व रोख रकमेसह अंदाजे १ लाख ६० हजार
चिखलीत घरफोडी करणारा 'मोक्का'तील कुख्यात आरोपी गजाआड; चिखली पोलिसांची धडक कारवाई
Chikhali Burglary Case: श्रीकृष्णनगर भागात राहणाऱ्या एका वयोवृद्धाचे घर फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लांबवणाऱ्या एका कुख्यात अट्टल चोराला चिखली पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली
कांद्रीच्या सुखदेव कॉलनीत घरफोडी; चांदी-सोन्यासह ९८ हजारांचा दागिने चोरी
Kandri Burglary Case: कांद्री येथील सुखदेव कॉलनी परिसरातील बंद घराचे कूलुप तोडुन अज्ञात चोरट्याने सुमारे ९८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघड कीस आली आहे