घोट तालुका निर्मितीसाठी लढा तीव्र

घोट तालुका निर्मितीसाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे नेतृत्व करण्याची गावकऱ्यांची विनंती

Ghot Taluka Formation: घोट येथील साईबाबा मंदिरात आयोजित बैठकीत घोट तालुका निर्मितीच्या मुद्यावर चर्चा झाली. डॉ. देवराव होळी यांना संघर्षाचे नेतृत्व सौंपण्यात आले आणि त्यांनी ते स्वीकारले.

घोट तालुका निर्मितीसाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे नेतृत्व करण्याची गावकऱ्यांची विनंती

Ghot Taluka Formation

घोट/गडचिरोली (Ghot Taluka Formation) : घोट येथे साईबाबा मंदिर मध्ये घोट तालुका संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या बैठकीत घोट तालुका निर्मितीचा महत्त्वपूर्ण मुद्दा चर्चेत आला असून समितीच्या वतीने माजी आमदार डॉ. होळी यांना या लढ्याचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव एकमुखाने मांडण्यात आला. यावर सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. होळी यांनी नेतृत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली, मात्र हा लढा यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिक, युवक, सामाजिक संघटना व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकजुटीने पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

घोट तालुका निर्मितीचा (Ghot Taluka Formation) प्रश्न हा केवळ प्रशासकीय नसून स्थानिक विकास, प्रभावी प्रतिनिधित्व आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी निगडित आहे. सध्या नागरिकांना शासकीय कामांसाठी लांब अंतर पार करावे लागत असल्याने वेळ व आर्थिक खर्च वाढतो. नवीन तालुका निर्माण झाल्यास प्रशासन अधिक जवळ येऊन सेवा जलद व सुलभ पद्धतीने उपलब्ध होतील.यासोबतच शिक्षण, आरोग्य,रस्ते व इतर मूलभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल.विशेषत आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे प्रशासन मिळून त्यांचे सशक्तीकरण होईल.तसेच शासकीय कार्यालयांच्या स्थापनेमुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

या बैठकीस घोट तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, सचिव आसिफ सय्यद, कोषाध्यक्ष अविनाश वडेट्टीवार,तमूस अध्यक्ष दिनकर लाकडे, विलास उईके,रूपा शहा, भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा,गिरिश उपाध्ये,विलास गण्यारपवार,प्रशांत शहा,पवन दुधबावरे,बंडू जुवारे,आदी उपस्थित पदाधिकारी व नागरिकांनी घोट तालुका निर्मितीसाठी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न आता अधिक प्रभावीपणे शासन दरबारी मांडला जाणार असून घोट तालुका निर्मितीसाठीचा संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले.

संबंधित सामग्री

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने गौरव केला. विकास, कल्याण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक भूमिकेचा ठरावात उल्लेख.

Oct 07, 2026
धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

Oct 02, 2026
टोकाई कारखान्याची वार्षिक सभा अध्यक्षांविनाच आटोपली; अनेक सभासदांनी मांडल्या तक्रारी

टोकाई कारखान्याची वार्षिक सभा अध्यक्षांविनाच आटोपली; अनेक सभासदांनी मांडल्या तक्रारी

Tokai Factory Annual Meeting: समत तालुक्यातील कुरूंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखाना लि., या संस्थेची सन २०२५-२६ ची २५ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

Sep 30, 2026
दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांनाही मदतीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांनाही मदतीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यांसाठी अन्य निकषांवर मदतीचा प्रस्ताव; पाणीवापर आणि दहावी-बारावी परीक्षा शुल्काबाबतही फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश.

Sep 29, 2026