टोकाई कारखाना वार्षिक सभा

टोकाई कारखान्याची वार्षिक सभा अध्यक्षांविनाच आटोपली; अनेक सभासदांनी मांडल्या तक्रारी

Tokai Factory Annual Meeting: समत तालुक्यातील कुरूंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखाना लि., या संस्थेची सन २०२५-२६ ची २५ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

टोकाई कारखान्याची वार्षिक सभा अध्यक्षांविनाच आटोपली; अनेक सभासदांनी मांडल्या तक्रारी

Tokai Factory Annual Meeting

कुरूंदा (Tokai Factory Annual Meeting) : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखाना लि., या संस्थेची सन २०२५-२६ ची २५ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर  बुधवारी रोजी दुपारी कारखाना स्थळावर पार पडली. मात्र संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव  जाधव हे सभेला गैरहजर राहिल्याने सभासदांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. नाइलाजास्तव माजी सरपंच राजेश पाटील इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. प्रमुख पदाधिकारी गैरहजर असल्याने सभासदांमध्ये संतापाचे वातावरण होते.

सभासदांच्या प्रमुख मागण्या व तक्रारी मध्ये  ऊस दरवाढीची मागणी  सभासदांनी यंदा ऊसाला ३४०० रुपये प्रति टन भाव द्यावा, अशी जोरदार मागणी केली. कुरुंदा परिसरातील सर्व सभासदांचा ऊस प्रथम तोडून न्यावा, नंतरच बाहेरील भागातून ऊस आणावा, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला. सभासद सुधीर दत्तराव दळवी यांनी मागील वर्षी माझा ऊस कारखान्याने वेळेवर नेला नाही, त्यामुळे कमी भावात गुळ कारखान्याला द्यावा लागला, माझे अतोनात नुकसान झाले याला कारखाना जबाबदार आहे अशी तक्रार मांडली.

शासनाने आश्वासन देऊनही आतापर्यंत सभासदांना मिळणारी साखर भेटली नाही, ती तात्काळ द्यावी अशी मागणीही शेतकर्‍यांनी केली.यामुळे सभेतील नियोजित विषय बाजूला राहून शेतकरी सभासदांच्या तक्रारींनीच सभा गाजली.  संचालक खोबराजी नरवाडे पाटील, शिवाजी इंगोले पाटील, संचालक प्रतिनिधी कुशोबा जमरे, साहेबराव पतंगे गजानन जाधव साहेबराव कराळे  विठ्ठल कराळे सुनील बागल जगदीश साळुंखे जगदीश दळवी यांच्यासह  सभासद उपस्थित होते.

सभेपुढील विषयात  मागील सभेचा इतिवृत्तांत कायम करणे, कामकाज अहवाल स्वीकृती,  नफा-तोटा व ताळेबंद मंजुरी,  लेखा परीक्षण अहवाल,  महसुली व भांडवली खर्चास मान्यता, सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक,  लेखा परीक्षक नेमणूक,  स्क्रॅप विक्री नोंद व ऐनवेळचे विषय ठेवण्यात आले होते. सभेचे आयोजन प्र. कार्यकारी संचालक प्रल्हाद गायकवाड यांनी केले होते.