कळमनुरी (Gas cylinder shortage) : शहरात मागील एक महिन्यापासून गॅस सिलेंडर टंचाईची समस्या तीव्र झाली असून, स्थानिक गॅस एजन्सीवर दररोज ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या एजन्सीकडे दोन ते तीन दिवसांत केवळ सुमारे ३४२ गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असताना दररोज २५०० ते २७०० गॅस सिलेंडर साठी ऑनलाईन बुकिंग होत आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
एक गॅस सिलेंडर सध्या ९३९ रुपयांना मिळत असूनही नागरिकांना वेळेवर (Gas cylinder shortage) सिलेंडर मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. परिणामी, एजन्सीसमोर दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरम्यान, २१ एप्रिल रोजी काही ग्राहकांनी त्यांची ऑनलाईन बुकिंग रद्द झाल्याची तक्रार करत एजन्सीवर गर्दी केली होती. परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नायब तहसीलदार अमोल घुगे यांनी तत्काळ एजन्सीला भेट दिली. त्यांनी नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत ग्राहकांच्या संख्येचे समाधान केले.
ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता एजन्सी परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय करावी तसेच उन्हाचा तीव्र कडाका लक्षात घेऊन नागरिकांसाठी सावली व बसण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना नायब तहसीलदारांनी दिल्या आहेत. तथापि, पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना अजून काही दिवस अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गॅस सिलेंडर टंचाईमुळे एजन्सीवर ग्राहकांच्या रांगा
Gas cylinder shortage: कळमनुरीत गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. दररोज ३४२ सिलेंडरचा पुरवठा होत असून, २५००-२७०० बुकिंग होत आहेत.
Gas cylinder shortage
संबंधित सामग्री
आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!
Asola Khurd water shortage: मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथे सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गावातील दोन्ही तलाव आणि कारपा व आसोला खुर्द शिवार
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय
अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे
महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..
Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार
मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर
मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा शिल्लक. सिद्धेश्वर, सीना-कोळेगाव शून्यावर; जायकवाडी 77.08% तर मांजरा 10% वर.