आसोला खुर्द भीषण पाणीटंचाई

आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!

Asola Khurd water shortage: मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथे सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गावातील दोन्ही तलाव आणि कारपा व आसोला खुर्द शिवार

आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!

Asola Khurd water shortage

मानोरा (Asola Khurd water shortage) : मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथे सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गावातील दोन्ही तलाव आणि कारपा व आसोला खुर्द शिवारातील नाल्यांवर शेतकऱ्यांनी बसविलेल्या २५ ते ३० मोटार पंपांमुळे पाण्याचा अनियंत्रित उपसा होत असल्याने पाणीपातळी झपाट्याने खाली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन हे सर्व मोटार पंप तात्काळ काढून अनधिकृत पाणी उपसा थांबवावा, अशी मागणी ग्रामपंचायत आसोला खुर्द च्या वतीने तहसीलदार  यांच्याकडे सरपंच निकीता वसंत राठोड व उपसरपंच बादल राठोड यांनी दि. ५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, आसोला खुर्द येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे पाणी पुरवठा (Asola Khurd water shortage) आहे. परंतु हे गाव योजनेच्या शेवटच्या टोकाला असल्याने चिकुटा धरणातून गावापर्यंत पाणी येण्यासाठी मध्ये ८ ते १० गावे लागतात. त्यामुळे गावापर्यंत पुरेसे पाणी येत नाही, पाणी येण्यासाठी ५ ते ६ दिवस लागतात. अशा परिस्थितीत गाव शिवारात असलेल्या दोन्ही तलावांमध्ये आणि शेत शिवारातील नाल्यांवर काही शेतकऱ्यांनी ७ ते १० हॉर्सपॉवर क्षमतेचे मोठे मोटार पंप बसवून मोठ्या प्रमाणात व सातत्याने पाण्याचा उपसा सुरू केला आहे.

त्यामुळे तलावातील (Asola Khurd water shortage) पाण्याची पातळी खालावली आहे. जर असाच पाणी उपसा सुरू राहिला तर भविष्यात नागरिकांसह जनावरांना पिण्यासाठीदेखील पाणी उपलब्ध होणार नाही, जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, असे निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी प. स. चे गटनेता गोपाल पाटील भोयर, सामाजिक कार्यकर्ता वसंतराव राठोड, सुनिल हांडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दुर्योधन जाधव, देवानंद राठोड आदीसह इतरांची उपस्थिती होती. निवेदनाच्या प्रतिलिपी गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे, मजिप्रा योजनेचे अभियंता, महावितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता यांना दिल्याचे नमूद केले आहे. 

प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी! 

ग्रामपंचायतीने शासनाच्या सूचनेनुसार गावात दवंडी देऊन नदी, नाले व जलसाठ्यांमधून पाणी उपसा करणाऱ्यांना मोटार पंप काढून घेण्याची सूचना दिली आहे. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू असल्याने केवळ ग्रामपंचायत स्तरावर कारवाई करणे शक्य नसून तहसील प्रशासनाची मदत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तातडीने स्थळ पाहणी करून आसोला खुर्द व कारपा शिवारातील दोन्ही तलाव व नाल्यांवरील मोटार पंप काढून घ्यावेत, अनधिकृत पाणी उपशाची पाहणी करून प्रशासकीय कारवाई करावी. तसेच कार्यकारी अभियंता, महावितरण (MSEDCL) यांना पत्र देऊन तलावांवरील पाणी उपशासाठी असलेली विद्युत जोडणी तपासून ती तात्काळ बंद करण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे.

संबंधित सामग्री

परवानगी न घेता बसविलेला स्मार्ट डिजिटल वीज मीटर काढण्याची मागणी

परवानगी न घेता बसविलेला स्मार्ट डिजिटल वीज मीटर काढण्याची मागणी

मीटर तात्काळ हटवून पूर्वीचा जुना मीटर पुन्हा बसवावा, अशी मागणी त्यांनी ३१ जुलै रोजी महावितरणच्या विद्युत अभियंत्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Jul 31, 2026
Shrimad Bhagwat Katha: आसोला खुर्द येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व यात्रमहोत्सव

Shrimad Bhagwat Katha: आसोला खुर्द येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व यात्रमहोत्सव

आसोला खुर्दमध्ये श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, कीर्तन व महाप्रसादाचा आयोजन २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत चालणार आहे.

Mar 16, 2026