जुगाराचा काळा खेळ

‘इनामा’च्या नावाखाली जुगाराचा काळा खेळ!, प्रशासनाची दुर्लक्ष

Gambling Black Game: तिरोडा व गोंदिया मध्ये शंकरपट नावाखाली जुगाराचा काळा खेळ चालू आहे. पोलीस व प्रशासनाची दुर्लक्ष करण्याचे आरोप आहेत.

‘इनामा’च्या नावाखाली जुगाराचा काळा खेळ!, प्रशासनाची दुर्लक्ष

Gambling Black Game

खाकीच्या ‘आशीर्वादाने' ग्रामीण संस्कृतीचा लिलाव!

तिरोडा/गोंदिया (Gambling Black Game) : ग्रामीण संस्कृतीचे वैभव असलेला ‘शंकरपट' आता केवळ जुगाराचा अड्डा बनला आहे. तिरोडा उपविभागीय क्षेत्रातील तिरोडा, गंगाझरी आणि दवनीवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सध्या कायद्याचे धिंडवडे काढले जात आहेत. इनामाच्या नावाखाली ४० ते ५० लाख रुपयांचा जुगार उघडपणे खेळला जात आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या खांद्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, तेच पोलीस ‘अर्थपूर्ण' शांतता राखून या काळ्या खेळाला अभय देत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनीच या प्रकरणी लक्ष देवून सुरू असलेल्या गैरप्रकारावर आळा घालावे, अशी मागणी ग्रामीण भागातून केली जात आहे.

जिल्ह्यासह तिरोडा उपविभागात मोठ्या प्रमाणात शंकरपटाचे आयोजन केले जात आहे. (Gambling Black Game) शंकरपट आयोजनातून मोठमोठी व आकर्षण बक्षिस ठेवली जातात. या माध्यमातून आयोजित शर्यतीचा भव्यता प्रदर्शित करण्याचे काम आयोजकांकडून केले जात आहे. परंतु,  हे बक्षिसांचे पैसे प्रत्यक्ष आयोजक नव्हे, तर जुगार माफिया पुरवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाखांच्या बक्षिसांचे आमिष दाखवून या पटाच्या आडून जुगाराचा बाजार भरवला जातो. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी आणि तरुणांना या विळख्यात ओढले जात असून, गावांमधील शांतता आणि संस्कृतीला यामुळे गालबोट लागत आहे.

तिरोडा, दवनीवाडा व गंगाझरी   हद्दीत एखादा छोटा जुगार खेळला गेला तर पोलीस तत्काळ धाड टाकून सिंघमगिरी दाखवतात. मात्र, डोळ्यादेखत लाखो रुपयांची जुगार उलाढाल होणार्‍या शंकरपटांकडे पोलीस जाणीवपूर्वक डोळेझाक का करत आहे? तिरोडा उपविभागातील काही पोलीस कर्मचारी आपले ‘आर्थिक हित' जोपासण्यासाठी या गुन्हेगारांना पाठबळ देत असल्याची चर्चा परिसरात जोरात सुरू आहे. कायद्याचा धाक उरला नसल्यानेच हे अवैध व्यवसाय आता गावागावांत फोफावले आहेत. (Gambling Black Game) शंकरपटाच्या नावाखाली सुरू असलेला हा जुगाराचा नंगानाच थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी आतापर्यंत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. सामान्य नागरिक या प्रकारामुळे त्रस्त असून, तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त होत आहे. आता तरी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, आपल्या विभागातील ‘हप्तेखोर' कर्मचार्‍यांवर आणि या जुगार माफियांवर कारवाई करणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जुगार व्यावसायिकांची मोर्चेबांधणी ग्रामीण भागात सध्या शंकरपटाच्या नावाखाली (Gambling Black Game) जुगार व्यावसायिकांनी आपली मोठी मोर्चेबांधणी होत असल्याचे दिसून येत आहे. हा संपूर्ण काळा बाजार एका विशिष्ट साखळीद्वारे चालवला जातो.कारवाईपासून वाचवण्यासाठी स्थानिक पातळीवर आर्थिक हितसंबंध जोपासले जातात. यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, संबंधित पोलीस स्टेशन हद्दीतील बीट हवालदार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या बीट इनचार्जपर्यंत ही साखळी पोहोचल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, गुन्हेगारी मोडीत काढण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कार्यप्रणाली यामुळे संशयाच्या भोवर्‍यात आली असून, त्यांची ही शांतता चर्चेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधीही या प्रकाराकडे मूकदर्शक म्हणून पाहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबंधित सामग्री

नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

Latur Matka-Gambling Raid: लातूरचे पोलीस हेल्मेट सक्तीच्या कामगिरीत गुंतले असताना दुसरीकडे नांदेडच्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने लातूर शहर जिल्ह्यात राजरोस चालणाऱ्या मटका व जुगारांवर धाड..

Oct 01, 2026
परभणीत तिरट जुगारावर छापा; ६ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

परभणीत तिरट जुगारावर छापा; ६ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त

Parbhani Gambling Raid: परभणी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असताना, स्थानिक गुन्हे शाखा व चुडावा पोलिसांच्या संयुक्त पथकाने सातेगाव-मीठापूर शिवार

Sep 28, 2026
गोंदियात ९ व्या राज्यस्तरीय फ्लोअरबॉल चॅम्पियनशिपचा दिमाखदार समारोप

गोंदियात ९ व्या राज्यस्तरीय फ्लोअरबॉल चॅम्पियनशिपचा दिमाखदार समारोप

Gondia Floorball Championship: गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलात  फ्लोअरबॉल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ गोंदिया आणि फ्लोअरबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन

Sep 24, 2026
गोंदिया मालगोदामात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गोंदिया मालगोदामात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Gondia Free Health Camp: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेतील नागपूर मंडळांतर्गत गोंदिया मालगोदाम येथे बुधवार, २३ सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वे मालगोदाम कामगार संघ मोफत आरोग्य तपासणी..

Sep 24, 2026
विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

पूर्व विदर्भातील 4 महामार्ग प्रकल्पांना मंजुरी; 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला मोठा फायदा अपेक्षित.

Sep 24, 2026