Gallops Restaurant

मुंबईतील गॅलॉप्स रेस्टॉरंटचा परवाना निलंबित; फ्रीजमधील बर्फावर रक्ताचे डाग, झुरळ-मुंग्यांचा वावर

मुंबईतील गॅलॉप्स रेस्टॉरंटचा FDAने परवाना निलंबित केला. तपासणीत बर्फावर रक्ताचे डाग, झुरळे, मुंग्या आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळल्या.

मुंबईतील गॅलॉप्स रेस्टॉरंटचा परवाना निलंबित; फ्रीजमधील बर्फावर रक्ताचे डाग, झुरळ-मुंग्यांचा वावर

Gallops Restaurant

FDAच्या तपासणीत स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; मालाड, वर्सोवा आणि वांद्रे येथील आणखी चार आस्थापनांवरही कारवाई

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्समधील प्रसिद्ध मेसर्स बीजेआरएस (गॅलॉप्स) रेस्टॉरंटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील फ्रीजमध्ये ठेवलेल्या बर्फावर मांसाहारी पदार्थांचे रक्त आणि केचपचे डाग आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. 22) सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम राबवली. त्यावेळी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या परिसरातील गॅलॉप्स रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. या तपासणीत स्वच्छता आणि अन्नसुरक्षेशी संबंधित अनेक त्रुटी निदर्शनास आल्या.

FDAच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्वयंपाकघरात जिवंत झुरळे आणि मुंग्या आढळल्या. फ्रीजमधील बर्फावर रक्त व केचपचे डाग होते. त्याशिवाय फाटलेल्या किंवा खराब पॅकिंगमध्ये कच्चा माल ठेवण्यात आल्याचे आढळले. स्वयंपाकघरात ग्रीस साचलेले होते, भिंतींची झीज झाली होती, ड्रेनेजची स्वच्छता समाधानकारक नव्हती, तर कॉकरोच ट्रॅप्स आणि इतर ठिकाणी योग्य झाकणाची व्यवस्था नसल्याचेही तपासणीत समोर आले. काही ठिकाणी पाणी साचल्याचेही आढळले.

अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणी आणि लसीकरणाशी संबंधित नोंदी उपलब्ध नसल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. यापूर्वी रेस्टॉरंटला त्रुटी दूर करण्यासाठी सुधारणा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतर झालेल्या फेरतपासणीतही नियमभंग कायम असल्याचे आढळल्याने परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी या त्रुटींचा संबंध Schedule 4 अंतर्गत असलेल्या स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांशी जोडला आहे. विशेष तपासणीदरम्यान आढळलेल्या बाबींमध्ये खराब पॅकेजिंग, अस्वच्छ ड्रेनेज, साचलेले पाणी, झुरळे-मुंग्या आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदींचा अभाव यांचा समावेश आहे.

दरम्यान, FDAने मुंबईतील अन्य काही खाद्य आस्थापनांवरही कारवाई केली आहे. मालाड पूर्व येथील मेसर्स गुरुकृपा डेअरी प्रॉडक्ट्समधून सुमारे ₹13.55 लाख किमतीचे 2,464.05 किलो भेसळयुक्त तसेच दिशाभूल करणारे लेबल असलेले तूप, रिफाइंड सनफ्लावर तेल आणि वनस्पती तूप जप्त करण्यात आले.

अंधेरी पश्चिमेतील वर्सोवा-यारी रोडवरील मेसर्स गुफरान सीख कॉर्नर हे वैध अन्न परवाना किंवा नोंदणीशिवाय सुरू असल्याचे तपासणीत आढळले. त्याठिकाणी Schedule 4 अंतर्गत काही नियमांचे उल्लंघनही निदर्शनास आले. त्यामुळे 22 सप्टेंबर रोजी बंधनकारक आदेश जारी करून वैध परवाना किंवा नोंदणी मिळेपर्यंत आणि त्रुटी दूर होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

वांद्रे पश्चिमेतील बँडस्टँड परिसरातील मेसर्स ड्रिमर हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचा परवानाही स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्याने निलंबित करण्यात आला. याचप्रमाणे वांद्रे पश्चिमेतील सेंट डोमिनिक रोडवरील मेसर्स मिरारी येथेही Schedule 4 अंतर्गत स्वच्छतेशी संबंधित त्रुटी आढळल्याचे FDAने स्पष्ट केले.

गॅलॉप्स रेस्टॉरंटची सुरुवात 1986 मध्ये झाली होती. जॅस्मिन आणि बॉबी सिंग तसेच राहुल मलिक या तीन मित्रांनी रेसकोर्सवर रेस्टॉरंट चालवण्याची बोली जिंकल्यानंतर हे रेस्टॉरंट सुरू केले. पुढील काही दशकांत प्रसिद्ध मेनू आणि महालक्ष्मी रेसकोर्सच्या विहंगम दृश्यामुळे गॅलॉप्सची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

FDAच्या कारवाईनंतर गॅलॉप्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, FSSAIच्या काही गरजा आणि अटी पूर्ण करण्यासाठी विक्री तात्पुरती थांबवण्यात आली आहे. ग्राहकांच्या संयमाबद्दल त्यांनी आभार व्यक्त करत लवकरच पुढील अपडेट देण्यात येतील, असेही स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026
CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

Oct 02, 2026
ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला; आता मेट्रो सिनेमापासून होणार सुरुवात

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला; आता मेट्रो सिनेमापासून होणार सुरुवात

राज-उद्धव ठाकरेंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला. आता भायखळ्याऐवजी मेट्रो सिनेमा जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात होणार.

Oct 02, 2026