माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांच्या हस्ते सत्कार
कन्हान (Lifetime Achievement Award) : कांद्री येथील रहिवासी शाहीर गजानन वडे भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडियाचे महारा ष्ट्र संघटन प्रमुख यांचे नुकतेच भव्य शाहीर कलाकार मेळावा मध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार कर ण्यात आला. सत्कार माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, शिवसेना नेते राधेशाम हटवार, शाहीर राजेंद्र बावन कुळे, नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शाहीर गजानन वडे हे आकाशवाणी कलावंत उत्कृष्ट भजन गायन, पोवाडे गायनाच्या माध्यमातुन समाज प्रबोधन करित आहे, तसेच (Lifetime Achievement Award) भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडियाचे महाराष्ट्र भर मेळावे होते त्या मेळावा मध्ये तन मन धनाने मदत करून प्रत्येक कार्यक्रम यशस्वि करित आहेत. त्यांच्या या सर्व कामा ची दखल घेऊन कार्यकारणी मंडळानी एकमताने पुर स्कारासाठी निवड करण्यात आली. गजानन वडे यांनी सत्कार स्विकार करतांनी सर्व शाहीर कलाकार आणि पाहुणे यांचे आभार मानले.