रिसोड (Gajanan Banore) : महाराष्ट्र सुवर्णकार संस्थेचा ‘रजत महोत्सव’ व सुवर्णालंकाराच्या तीन दशकापूर्ती सोहळ्यानिमित्त सर्व शाकीय राज्यस्तरीय सोनार महोत्सव राज्यस्तरीय महिला मेळावा २०२६ चे आयोजन ३ मे रोजी नागपूर येथील रेशीम बाग मधील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र सुवर्णकार संस्था नागपूर चे पुरुषोत्तमजी कावळे हे होते तर स्वागताध्यक्ष राजेशजी रोकडे, विशेष अतिथी गृहराज्यमंत्री मा. पंकजाची भोयर, महापौर नीताताई ठाकरे, खासदार राजेशजी वर्मा, सुवर्णलंकार मासिकचे मुख्य संपादक प्रकाश माथने, राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र वर्मा, आमदार कृष्णा भाऊ खोपडे, आमदार मोहनजी मते, आमदार प्रवीणजी दटके, माजी आमदार सुधाकर कोहळे, मध्यप्रदेश सराफा असोशिएशनचे अध्यक्ष राजा सराफ, भारतीय सुवर्णलंकार संघ दुलीचंदजी कडेल यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये सर्व मान्यवरांनी सोनार समाजातील सर्व शाखांनी एकत्र येऊन सोनार समाजाला विकासात्मक प्रवाहात आणण्याची आवाहन केले तसेच शाखा भेद न पळता मुला-मुलींचे विवाह पार पाडणे, सोनार व्यवसायातील अडचणी कशा प्रकारे सोडविता येतील यासह अनेक विषयावर व्यासपिठावरील मान्यवरांनी आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केले. सोनार समाजातील प्रतिभान व्यक्तीचा तसेच नवनिर्वात सोनार समाजातील नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्य करणार्या व्यक्तीचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व शिल्ड देऊन सन्मान करण्यात आला.
पत्रकारीता क्षेत्रात गेल्या ३५ वर्षापासून कार्यरत असलेले व सामाजिक कार्यात नेहमी सहभागी होणारे पत्रकार गजानन बानोरे (Gajanan Banore) यांचा व्यसपिठावरील मान्यवरारंच्या हस्ते ‘महाराष्ट्र सुवर्ण रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
‘महाराष्ट्र सुवर्ण रत्न पुरस्काराने’ पत्रकार गजानन बानोरे सन्मानित
Gajanan Banore: 'महाराष्ट्र सुवर्ण रत्न पुरस्काराने' पत्रकार गजानन बानोरे सन्मानित झाले. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला.
Gajanan Banore
संबंधित सामग्री
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही
नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?
राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला
महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.
कुरखेड्यात ‘नागपूर करार होळी’ आंदोलन; स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा एल्गार
Nagpur Karar Holi Andolan: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुरखेडा परिसरात ‘नागपूर करार होळी’ आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तसेच नागपूर करार
नागपूर कराराची चिखलीत होळी; स्वतंत्र विदर्भाच्या घोषणांनी परिसर दणाणला
Nagpur Agreement Holi: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ आंदोलन समितीने दिलेल्या आवाहनानुसार सोमवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी चिखली येथे शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर कराराची होळी करण्यात आली.