मानोरा (Gadegaon water shortage crisis) : तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गादेगाव तांड्यावर पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास १ मे २०२६ रोजी पंचायत समिती मानोरा येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सुदाम भिका जाधव यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मानोरा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गादेगाव हे १४०० लोकवस्तीचे गाव असून येथे ग्रामीण पाणीपुरवठा, जल जीवन मिशन आणि माजी आमदार गजानन यांच्या २८ गावातील जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. तरीही गादेगाव तांड्यावर गटातटातील राजकारणामुळे लग्नसराईत पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
२२ एप्रिल २०२५ पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी माजी सरपंच भारत आडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर आंदोलन ?(Gadegaon water shortage crisis) केले होते. तरीही पाणी पुरवठा सुरळीत न होता पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. यामुळे ३० एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा न झाल्यास १ मे रोजी काळे झेंडे दाखवून विरोध करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गावात तीन योजना आणि पाण्याची टाकी असतानाही सणासुदीला व उन्हाळ्यात लग्नसराई पाणीपुरवठा (Gadegaon water shortage crisis) होत नसल्याने नागरिकांना सकाळ-संध्याकाळ पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तांड्यातील महिलांना पाण्यासाठी डोंगर-दरी पालथी घालावी लागत असून, वाढत्या उन्हात ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. पाण्यासाठी राजकारण करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी या गंभीर समस्येतून तातडीने दिलासा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून, जिल्हाधिकारी वाशिम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम, तहसीलदार मानोरा आणि ठाणेदार मानोरा यांनाही याची प्रतिलिपी पाठवण्यात आली आहे.
गादेगाव तांड्यावर पाणी टंचाई; १ मे रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा!
Gadegaon water shortage crisis: गादेगाव तांड्यावरील पाणीटंचाईमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. १ मे २०२६ रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला आहे.
Gadegaon water shortage crisis
संबंधित सामग्री
कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे
Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.
पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी
MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण
Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!
Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.