जिल्हा परिषद कांत्राटी शिक्षक

जिल्ह्यातील  जिल्हा परिषद कांत्राटी शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा; शिक्षक सेनेची मागणी

ZP Contract Teacher: शिवसेना शिंदे गट गटाच्या सचिव व प्रवक्ता तसेच विदर्भ विभागीय संपर्क मंत्री मनीषा ताई कायंदे विधानपरिषद आमदार यांचा नुकताच गडचिरोली येथे दौरा आयोजित

जिल्ह्यातील  जिल्हा परिषद कांत्राटी शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा; शिक्षक सेनेची मागणी

ZP Contract Teacher

कोरेगाव,चोप/ गडचिरोली (ZP Contract Teacher) : शिवसेना शिंदे गट गटाच्या सचिव व प्रवक्ता तसेच विदर्भ विभागीय संपर्क मंत्री मनीषा ताई कायंदे विधानपरिषद आमदार यांचा नुकताच गडचिरोली येथे दौरा आयोजित केला होता. शिवसेनेच्या पदाधिकारी ची संघटनात्मक बैठक गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे तसेच सहसंपर्कप्रमुख हेमंत जांबेवार यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथेसभा पार पडली  व आरमोरी येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या अध्यक्ष ते मध्ये सभा पार पडली सदर बैठकीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

त्यातच शिक्षक सेनेच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद मध्ये पेसा क्षेत्रात कार्यरत कंत्राटी शिक्षकांचा प्रश्न शिवसेनेच्या वतीने मनीषा ताई कायंदे आमदार विधान परिषद तथा सचिव शिवसेना यांना अवगत करून देण्यात आला पेसा क्षेत्रात कार्यरत जिल्हा परिषद शिक्षकांना सन 24-25 मध्ये कांत्राटी पद्धतीने नोकरीवर घेण्यात आले होते गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये दुर्गम व अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात शिक्षकांची बरीच पदे रिक्त होती,आहेत .त्यामुळे त्या रिक्त पदावर टीईटी,सीईटी पास शिक्षक उमेदवारांना कंत्राटी शिक्षण म्हणून नेमले होते परंतु फेब्रुवारी 2026 मध्ये निघालेल्या शासन परिपत्रकानुसार सदर शिक्षक भरती पवित्र पोर्टल द्वारे करण्यात येणार आहे.

त्यामुळे जुन्या कार्यरत शिक्षकांना डावलले जाऊन त्यांचे कुटुंबावर उपासमारीची पाळी येऊ शकते म्हणून पवित्र पोर्टल मध्ये 50% जागा उपलब्ध करून देऊन पात्र शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक  करावी अशी मागणी शिवसेना शिक्षक सेनेच्या वतीने श्री भूषण भजनराव अलामे अध्यक्ष शिक्षक सेना गडचिरोली यांनी केली आहे. त्यावर सौ मनीषा ताई कायंदे विधानपरिषद आमदार तथा शिवसेना सचिव व प्रवक्त्या तथा पूर्व विदर्भ संपर्क मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सदर प्रश्न मार्गी लावण्याकरिता वरिष्ठ स्तरावर प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले आहे सदर निवेदन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर गडचिरोली जिल्ह्याच्या महिला संपर्कप्रमुख वर्षाताई मोरे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष नारायण धकाते आरमोरी विधानसभा समन्वयक राकेश बैस यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

संबंधित सामग्री

अखेर पालिका प्रशासन नरमले, शिवसेनेच्या मागण्या मान्य!

अखेर पालिका प्रशासन नरमले, शिवसेनेच्या मागण्या मान्य!

Latur Municipal Shiv Sena: लातूर महापालिका ने शिवसेनाच्या मागण्यांना मान्य करण्याच्या प्रक्रिया सुरू केली. महापालिकेच्या आयुक्तांनी विकास शुल्कचा चक्का, शहरातील सर्विस रोडवर अतिक्रमण

Aug 13, 2026
कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यात १६ जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली 

कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यात १६ जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली 

Debt-Waiver Tractor Rally: मराठवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ जूनला कर्जमुक्तीसाठी ट्रॅक्टर रॅली झाल्याविषयी चर्चा होईल. शिवसेनेने मागितलेल्या अटांना पाळण्याच्या आशयासह शासनाने प्रतिक्रिया

Jun 14, 2026