वनविभागाच्या डेपोला आग लावल्याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

घोट वनपरिक्षेत्रातील वन विभागाच्या शासकीय लाकूड डेपोला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याविरोधात घोट पोलीस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनविभागाच्या डेपोला आग लावल्याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

Forest Department

लाखोंचे नुकसान; घोट पोलीस मदत केंद्रात गुन्हा दाखल

घोट (Forest Department) : घोट वनपरिक्षेत्रातील वन विभागाच्या शासकीय लाकूड डेपोला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याविरोधात घोट पोलीस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, २४ मे रोजी डेपोच्या शेजारील शेतातील काडीकचरा व तण जाळण्यासाठी शेतकरी विनोद विश्वनाथ गुरनुले (वय ३२, रा. कर्दुळ निकतवाडा) यांनी आग लावली होती. मात्र ही आग नियंत्रणाबाहेर जाऊन वन विभागाच्या विक्री आगारापर्यंत पोहोचली.

या भीषण आगीत डेपोतील मिश्र जातीचे अंदाजे ३०० ते ३५० बिट जळून खाक झाले. तसेच परिसरातील विविध जातींच्या उभ्या झाडांनाही आग लागून मोठे नुकसान झाले. या घटनेत वन विभागाचे अंदाजे १८ ते १९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी घोट येथील लाकूड आगाराचे क्षेत्रसहाय्यक अरुण येनगंटीवार यांनी २५ मे रोजी घोट पोलीस मदत केंद्रात फिर्याद दाखल केली. फिर्यादीत, शेतातील काडीकचरा जाळताना आग इतरत्र पसरून नुकसान होऊ शकते याची कल्पना असतानाही निष्काळजीपणे आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या आगीत वन विभागासह जंगल कामगार संस्था पळसगाव यांचेही नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीवरून घोट पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२४(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गोगले करीत आहेत.

संबंधित सामग्री

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

Oct 02, 2026
गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला. भामरागड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले.

Sep 26, 2026
धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026
ठाकूरनगर परिसरात वाघाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

ठाकूरनगर परिसरात वाघाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

Ghot Tiger Attack: घोट नजीक ठाकूरनगर गावालगत वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) क्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ५२९ मध्ये गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास वाघाने गुराख्यावर हल्ला केल्याची घटना.

Sep 24, 2026
विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

विदर्भाला महामार्गांची मोठी भेट; 4 प्रकल्पांना मंजुरी, 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी

पूर्व विदर्भातील 4 महामार्ग प्रकल्पांना मंजुरी; 547 किमी मार्गांसाठी ₹51,906 कोटी. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला मोठा फायदा अपेक्षित.

Sep 24, 2026