Flood Rescue

पुराच्या वेढ्यात शेतात अडकलेल्या तिघांना किर्र अंधारात एसडीआरएफच्या जवानांनी दिले जीवदान

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात बुधवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आला.

पुराच्या वेढ्यात शेतात अडकलेल्या तिघांना किर्र अंधारात एसडीआरएफच्या जवानांनी दिले जीवदान

Flood Rescue

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात बुधवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आला. लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन जण नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने एसडीआरएफच्या मदतीने बचाव मोहीम राबवत तिन्ही जणांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.

बचाव करण्यात आलेल्यांमध्ये नवी केये कुडयामी (वय 40), अर्चना केये कुडयामी (वय 16) आणि अक्षरा केये कुडयामी (वय 3), सर्व रा. लाहेरी, ता. भामरागड यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तिघे बुधवारी सकाळी शेतातील कामासाठी गावाबाहेर गेले होते. सकाळपासूनच भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता. दुपारनंतर पामुलगौतम नदी तसेच परिसरातील नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास नदीला मोठा पूर आला. त्याचवेळी लाहेरी येथील नालाही दुथडी भरून वाहू लागल्याने संबंधित तिघे नदी आणि नाल्याच्या मधील भागात अडकून पडले.

सतत कोसळणारा पाऊस आणि वाढते पाणी यामुळे चारही बाजूंनी त्यांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने नदी अथवा नाला पार करणे अशक्य झाले होते. परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता.

सायंकाळी सुमारे 6.30 वाजता गावकऱ्यांनी भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदतीची मागणी केली. घटनेची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना देण्यात आली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विलंब न करता एसडीआरएफ पथकाला बचावकार्यासाठी रवाना करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेदरम्यान मुसळधार पाऊस, किर्र अंधार आणि वेगवान प्रवाहाचा सामना करत एसडीआरएफच्या जवानांनी धाडसी बचाव मोहीम राबविली. अथक प्रयत्नांनंतर तिन्ही व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचे प्राण वाचले.

या बचाव मोहिमेत तहसीलदार किशोर बागडे, एसडीआरएफचे पीएसआय मंगलसिंग डाबेराव व त्यांच्या पथकाने, लाहेरी येथील ग्रामस्थांनी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि जिल्हा प्रशासन, महसूल विभाग व एसडीआरएफ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे ही जीव वाचविणारी मोहीम यशस्वी ठरली.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026