Fire Incident

दिग्रस बु. ग्रामपंचायत कार्यालयात भीषण आग; शासकीय कागदपत्रे खाक, ५ ते ६ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचा आरोप

पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिग्रस बु. गटग्रामपंचायत कार्यालयाला सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.

दिग्रस बु. ग्रामपंचायत कार्यालयात भीषण आग; शासकीय कागदपत्रे खाक, ५ ते ६ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचा आरोप

Fire Incident

पातूर पोलिसांत तक्रार दाखल; सखोल चौकशीची ग्रामस्थांची मागणी

पातूर : पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिग्रस बु. गटग्रामपंचायत कार्यालयाला सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत कार्यालयातील अत्यंत महत्त्वाचे शासकीय दस्तावेज व कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आग लागली त्यादरम्यान कार्यालयातील लाखो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी सरपंच (प्रशासक) व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयातून धूर व आगीच्या ज्वाला निघत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दस्तावेज, दप्तर तसेच भारतीय राष्ट्रीय ध्वजाचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

४ ते ५ एलईडी टीव्हीसह ६० ते ६५ विद्युत दिवे चोरीला?

आगीच्या या घटनेसोबतच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील सुमारे ४ ते ५ एलईडी टीव्ही, विद्युत खांबावर लावण्यासाठी आणलेले अंदाजे ६० ते ६५ एलईडी दिवे तसेच इतर महत्त्वाचे साहित्य, असा एकूण ५ ते ६ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. आगीच्या आडून हा चोरीचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळजनक चर्चा सुरू आहे.

पोलिसांकडून पंचनामा; ग्रामस्थांमध्ये संताप

घटनेची माहिती मिळताच मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला. मात्र, वृत्त लिहिपर्यंत पंचनाम्याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती. दरम्यान, या संपूर्ण घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, घटनेची तक्रार देण्यासाठी काही नागरिक पातूर पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, त्यांची स्वतंत्र लेखी तक्रार तातडीने स्वीकारण्यात आली नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या प्रकारानंतर काही स्थानिक युवकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले व या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026