FDA Action

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचा धडाका; मुंबईतील ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित, बीडमध्ये १.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDAकडून सुरू असलेल्या कारवाईची चर्चा सध्या राज्यभरात होत आहे.

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचा धडाका; मुंबईतील ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित, बीडमध्ये १.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त

FDA Action

अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि नियमभंगामुळे मुंबईत कारवाई; बीडमध्ये १.१९ लाख किलो खाद्यतेलावर FDAचा छापा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDAकडून सुरू असलेल्या कारवाईची चर्चा सध्या राज्यभरात होत आहे. भेसळ, अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत मुंबईतील आणखी चार हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली असून त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

FDAच्या कारवाईत दादरमधील Eat Nino, अंधेरीतील जय माँ काली ढाबा, सांताक्रूझमधील House of Maharashtra आणि कुर्ल्यातील South Indian Dosa Corner या चार हॉटेल्सचा समावेश आहे. तपासणीदरम्यान संबंधित ठिकाणी अस्वच्छता, झुरळे, घरमाशांचा वावर तसेच गंजलेली भांडी आढळून आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आरोग्य आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने या चारही आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

मुंबईपुरती ही मोहीम मर्यादित नसून महाराष्ट्रातील विविध भागांतही FDAकडून तपासणी आणि कारवाई सुरू आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तसेच नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाचा विशेष लक्ष असल्याचे या कारवायांमधून दिसून येत आहे.

IIT Bombayमधील दोन कँटीनवरही कारवाई

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर IIT Bombay कॅम्पसमधील दोन कँटीन तात्काळ बंद करण्यात आल्या आहेत. तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गुटखा, भेसळ, औषधांमधील अनियमितता, हॉटेल्समधील नियमभंग आणि बेकायदेशीर प्रकारांविरोधात कारवाईचा सिलसिला सुरू आहे.

याच मोहिमेचा भाग म्हणून IIT Bombay परिसरातील दोन कँटीनवरही FDAने कारवाई केली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने गंभीर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

बीडमध्ये खाद्यतेलाच्या पाच आस्थापनांवर छापे

दुसरीकडे, बीड जिल्ह्यातही FDAने खाद्यतेलाच्या बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १ कोटी ९४ लाख ५० हजार ९२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत तब्बल १ लाख १९ हजार १८६ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या कारवाईनुसार, रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड अशी आकर्षक नावे वापरून तसेच पॅकिंगमध्ये बदल करून एकाच प्रतीचे तेल बाजारात विक्रीसाठी आणले जात असल्याचा प्रकार समोर आला. खाद्यतेलाचे बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक करणाऱ्या आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली.

बीड शहरातील स्वागत ऑईल इंडस्ट्रीज आणि चरखा ऑईल मिल, वडवणीतील जय हनुमान ट्रेडर्स, तसेच माजलगावमधील जानवी कमर्शियल आणि विनायक ऑइल मिल या पाच ठिकाणी FDAने छापे टाकले.

कारवाईनंतर या पाचही आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले असून संबंधित ठिकाणे सील करण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाचा साठा जप्त झाल्याने बीड जिल्ह्यात या कारवाईची चर्चा सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात FDAने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे संबंधित व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026