सरकारी धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे – किसान ब्रिगेडच्या शिबिरात प्रकाश पोहरेंचा घणाघात

बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप येथील पोहरे फार्ममध्ये शनिवार दिनांक 23 मे रोजी किसान ब्रिगेडचे प्रबोधन शिबिर राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक प्रकाश पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.

सरकारी धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे – किसान ब्रिगेडच्या शिबिरात प्रकाश पोहरेंचा घणाघात

Farmers Rights

अच्छे दिनाच्या स्वप्नात बुरे दिनाला सुरुवात – श्यामसुंदर महाराज

बार्शीटाकळी (Farmers Rights) : बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप येथील पोहरे फार्ममध्ये शनिवार, दिनांक 23 मे रोजी सकाळी 11 वाजता किसान ब्रिगेडचे प्रबोधन शिबिर राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक प्रकाश पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संविधान बचावचे श्यामसुंदर महाराज, किसान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत वराडे, प्रदेश प्रवक्ता धनंजय मिश्रा, विभागीय अध्यक्ष दिवाकर गावंडे, जिल्हाध्यक्ष भगवंतराव गवळी, कार्याध्यक्ष शरद वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे, जिल्हा सरचिटणीस गजानन हरणे, राजेश मावळे, प्रदीप चोरे, गजानन अमदाबादकर, रामधन दामोदर, सिद्धार्थ तायडे, विठ्ठल कुलट, बाळासाहेब मालोकार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात बळीराजाच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय मिश्रा यांनी तर संचालन प्रदीप चोरे यांनी केले.

प्रकाश पोहरे यांचा घणाघात

राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांनी शेतीतील बदल, विविध समस्या, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी हमीभाव तसेच सरकारच्या आयात-निर्यात व अनुदान धोरणांवर टीका केली.

“सरकारी चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. निवडणुकीच्या काळात जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्यांनी ‘बुरे दिन’ची सुरुवात केली आहे. सत्ताधारी व विरोधक दोघांनाही शेतकऱ्यांच्या दुःखाचा विसर पडला आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.

तसेच शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय व शेतीवर आधारित उद्योग निर्माण करावेत, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी संघटित होऊन किसान ब्रिगेडमध्ये सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्यामसुंदर महाराजांचे मत

संविधान बचावचे श्यामसुंदर महाराज यांनी शेतकऱ्यांनी संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, संविधान बदलण्याची तसेच जाती-धर्मात भांडणे लावून सत्ता मिळविणाऱ्या राज्यकर्त्यांना व विरोधकांना शेतकऱ्यांच्या दुःखाचा विसर पडला आहे.

किसान ब्रिगेडने शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले आणि शेतकऱ्यांनी आपले हित जपण्यासाठी संघटित होऊन किसान ब्रिगेडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

उपस्थित मान्यवर

या कार्यक्रमाला बबन कानकिरड, अनिकेत वाकपांजर, विजय महाराज, रामेश्वर सपकाळ, गोपाल शेंडे, निलेश लाड, सचिन शेटे, श्रीकृष्ण माळी, विजय मोडक, रुपेश पोहरे, गोपाल अतकर, संजय वानखडे, दीपक काकड, तुषार हांडे, दिनकर बोडखे, गणेश राठोड, अनिकेत दौंड, विकास महल्ले, विशाल लाहोळे, स्वराज थोटे, राहुल ढोक, सुरेश सदाशिव, मच्छिंद्र शिरसाट, नरेंद्र महल्ले, पूर्णा वाकपांजर, संतोष घोडके, भूषण सिंगापुरे, दिनेश रत्नपारखी, मंगेश राऊत, अक्षय खोड, अंकुश सदार, शिवदास ढाकुलकर, निखिल सांगोळे, निलेश हांडे, प्रकाश डिवरे, मुरलीधर लव्हाळे, श्रीराम लांडे, गजानन मालोकार, आनंद मालोकार, प्रवीण भोरे, नंदकिशोर गावंडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शरद वानखडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संबंधित सामग्री

जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळ भीषण अपघात; टँकरखाली दुचाकी घुसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळ भीषण अपघात; टँकरखाली दुचाकी घुसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

Aug 25, 2026
15 ऑगस्टपासून सुरु होणार 'कॉकरोच जनता पार्टी'ची देशव्यापी मोहीम!

15 ऑगस्टपासून सुरु होणार 'कॉकरोच जनता पार्टी'ची देशव्यापी मोहीम!

CJP School Abhiyan: गावांतील सरकारी शाळांची दयनीय अवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कॉकरोच जनता पक्षाने (CJP) एका मोठ्या मोहिमेची घोषणा

Aug 11, 2026
शिवसेना पक्षसंघटन व्यापक करण्यासाठी कामाला लागा: संपर्क प्रमुख चव्हाण

शिवसेना पक्षसंघटन व्यापक करण्यासाठी कामाला लागा: संपर्क प्रमुख चव्हाण

Latur Shiv Sena: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक भक्कम आणि व्यापक

Aug 06, 2026